मुंबई मेट्रो २-अ विस्ताराचे लोकार्पण; कुर्ला-BKC पॉड टॅक्सी प्रकल्पाला हिरवा कंदील

मुंबईत मेट्रो २-अ मार्गाचा विस्तार सुरू; ना. ग. आचार्य उद्यान ते मंडाळे मार्गाचे लोकार्पण. कुर्ला-BKC पॉड टॅक्सी प्रकल्पामुळे लास्ट माईल कनेक्टिव्हिटी मजबूत होणार.

Apr 8, 2026 - 03:48
Apr 8, 2026 - 03:52
 0  8
मुंबई मेट्रो २-अ विस्ताराचे लोकार्पण; कुर्ला-BKC पॉड टॅक्सी प्रकल्पाला हिरवा कंदील
मुंबई मेट्रो -२

मुंबईतील मेट्रो मार्ग २-अ वरील ना. ग. आचार्य उद्यान ते डायमंड गार्डन ते महाराष्ट्र नगर (मंडाळे) या महत्त्वाच्या मार्गाचे लोकार्पण आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  व सुनेत्रा  पवार  यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी आमदार मंगेश कुडाळकर आणि माजी खासदार राहुल शेवाळे हे देखील उपस्थित होते.

यावेळी महत्त्वाकांक्षी पॉड टॅक्सी प्रकल्पाचे ई-भूमिपूजन देखील करण्यात आले. लास्ट माईल कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा कुर्ला रेल्वे स्थानक येथे उभारण्यात येणार असून, पुढील २० महिन्यांत तो कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.

ही पॉड टॅक्सी सेवा कुर्ला रेल्वे स्थानक ते बीकेसी (BKC) आणि वांद्रे बिझनेस डिस्ट्रिक्ट परिसराला जोडणार आहे. त्यामुळे कुर्ला परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, दैनंदिन प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे.

या दोन्ही प्रकल्पांमुळे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. तसेच आधुनिक पायाभूत सुविधांना चालना मिळून शहराच्या विकासाला नवी गती मिळणार आहे.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0