खरात प्रकरणात व्हिडिओ लीक गंभीर; CDR खाजगी व्यक्तीकडे कसा? – वर्षा गायकवाड

अशोक खरात प्रकरणातील व्हिडिओ लीक आणि CDR प्रकरणावर वर्षा गायकवाड यांचा सवाल; सखोल चौकशीची मागणी.

Apr 7, 2026 - 01:51
 0  1
खरात प्रकरणात व्हिडिओ लीक गंभीर; CDR खाजगी व्यक्तीकडे कसा? – वर्षा गायकवाड
खासदार वर्षा गायकवाड

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात महिलांचे व्हिडिओ सार्वजनिक होणे अत्यंत गंभीर आणि आक्षेपार्ह असल्याची तीव्र प्रतिक्रिया वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. तसेच या प्रकरणात कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) खाजगी व्यक्तींकडे कसा पोहोचला, याची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, अशोक खरातने अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केले असून हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू होता. मात्र, याची माहिती स्थानिक पोलिसांना कशी मिळाली नाही, हा मोठा प्रश्न आहे. राज्याच्या गुप्तचर यंत्रणांचे हे अपयश असल्याचे त्यांनी नमूद केले.

त्या पुढे म्हणाल्या की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रकरण उघड केल्याचा दावा करत असले तरी इतकी वर्षे या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष का झाले, याचे उत्तर द्यावे लागेल. तसेच या प्रकरणात काही राजकीय नेते आणि मंत्र्यांचे संबंध असल्याचे समोर येत असताना सरकार त्यांची चौकशी का करत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

अशोक खरातशी संबंधित काही व्यक्तींचे कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) बाहेर आल्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, हा संवेदनशील डेटा खाजगी व्यक्तीकडे कसा पोहोचला, आणि त्यातील काहीच नावे का जाहीर करण्यात आली, यामागे राजकीय हेतू असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

या पत्रकार परिषदेला मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, उपाध्यक्ष अखिलेश यादव, जिल्हाध्यक्ष रवि बावकर, राजपती यादव, नगरसेविका अजंता यादव आणि अर्शद आझमी यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या विशेष पुनरीक्षण मोहिमे (SIR) संदर्भात मुंबई काँग्रेसची बैठकही Varsha Gaikwad यांच्या अध्यक्षतेखाली राजीव गांधी भवन येथे पार पडली. या बैठकीत SIR मोहिमेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0