मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या भक्त निवासाचे भूमिपूजन
पंढरपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेऊन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या भक्त निवासाचे भूमिपूजन केले. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.
प्रतिनिधी देवानंद शिंदे
पंढरपूर, दि. २५ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंढरपूर येथील नाथ चौकातील श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पावन पादुकांचे दर्शन घेऊन विधिवत पूजा-अर्चना केली. त्यानंतर त्यांच्या हस्ते श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या नव्या भक्त निवासाचे भूमिपूजन करण्यात आले.
या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी भक्त निवासाच्या उभारणीमुळे राज्यभरातून तसेच देशभरातून येणाऱ्या वारकरी आणि भाविकांना अधिक चांगल्या निवास सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त केला. भक्तांच्या सोयीसुविधा वाढविण्यासाठी शासन आणि संस्थानच्या संयुक्त प्रयत्नांना गती देण्याची भूमिका त्यांनी यावेळी मांडली.
भूमिपूजन सोहळ्यास सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार बापूसाहेब पठारे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त योगी निरंजननाथ गुरु शांतिनाथ, पालखी सोहळा प्रमुख तथा विश्वस्त राजेंद्र उमाप, विश्वस्त चैतन्य लोंढे, डॉ. रोहिणी पवार, पुरुषोत्तम पाटील यांच्यासह संस्थानचे पदाधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. भक्तांच्या सेवेसाठी उभारण्यात येणारे हे भक्त निवास वारकरी संप्रदायासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0