राजधानीत प्रबोधनकार ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन
नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे समाजसुधारक व आद्य प्रवर्तक प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
प्रतिनिधी: नरेश शिंदे
नवी दिल्ली, दि. १७ : समाजसुधारक व आद्य प्रवर्तक प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राजधानी दिल्लीतील कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदन येथे त्यांना अभिवादन करण्यात आले.
महाराष्ट्र सदनाचे सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
या कार्यक्रमास जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, व्यवस्थापक सारिका शेलार, सहाय्यक लेखाधिकारी निलेश केदारे यांच्यासह महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. सामाजिक प्रबोधन, समाजसुधारणा आणि जनजागृतीच्या क्षेत्रातील त्यांच्या कार्याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.
प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या अभिवादन कार्यक्रमातून त्यांच्या सामाजिक व प्रबोधनपर कार्याचे स्मरण करण्यात आले.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0