जनतेला दिलेला शब्द पूर्ण; आमदार सईद खान यांच्या पुढाकारातून पाथरीत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा साकार
परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरातील सेलू कॉर्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. आमदार सईद खान यांनी निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन पूर्ण करत हा उपक्रम राबविला. यावेळी खासदार बंडू जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
परभणी | मराठवाडा ब्युरो - लक्ष्मण चौरे
परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरातील सेलू कॉर्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला असून, अनेक वर्षांपासूनची शहरवासीयांची प्रतीक्षा अखेर पूर्ण झाली आहे. आमदार सईद भैया खान यांनी निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन पूर्ण करत हा पुतळा उभारला असून, या प्रसंगी खासदार बंडू जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाथरी शहरात शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. सेलू कॉर्नर येथे यापूर्वी "नियोजित पुतळा स्थळ" असा फलक लावण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्ष कामाला गती मिळत नव्हती. दरवर्षी याच ठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी केली जात होती.
निवडणुकीदरम्यान आमदार सईद खान यांनी पाथरीकरांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला. आमदार झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांत पुतळ्याची उभारणी, भव्य चबुतरा तसेच परिसराचे सुशोभीकरण पूर्ण करण्यात आले.
या ऐतिहासिक प्रसंगी खासदार बंडू जाधव यांनी उपस्थित राहून या कार्याचे कौतुक केले. तसेच शिंदे गटाच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि स्थानिक कार्यकर्त्यांनीही या उपक्रमात सहकार्य केले.
शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारल्यामुळे पाथरी शहराच्या सौंदर्यात भर पडली असून, नागरिकांनी आमदार सईद खान आणि खासदार बंडू जाधव यांचे आभार व्यक्त केले. हा उपक्रम पाथरी शहराच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0