लातूर-मुंबई ट्रेन क्रमांक 22108 मध्ये प्रचंड गर्दी; प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
लातूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान धावणाऱ्या ट्रेन क्रमांक 22108 मध्ये तात्काळ तिकीटधारक प्रवाशांना प्रचंड गर्दीमुळे मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला. बोगी S8 मध्ये उभे राहण्यासाठीही जागा नसल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
मुंबई प्रतिनिधी
मुंबई, दि. १३ : लातूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान धावणाऱ्या ट्रेन क्रमांक 22108 मध्ये प्रवाशांच्या सुरक्षितता व मूलभूत सुविधांचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. तात्काळ तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार समोर आली आहे.
प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, PNR क्रमांक 8248362549 अंतर्गत बोगी क्रमांक S8 मधील सीट क्रमांक 22 आणि 24 वर प्रवास करत असताना संबंधित डब्यात प्रचंड गर्दी होती. परिस्थिती इतकी गंभीर होती की, प्रवाशांना उभे राहण्यासाठीही पुरेशी जागा उपलब्ध नव्हती. विशेष म्हणजे WC आणि washroom पर्यंत जाणेसुद्धा अत्यंत कठीण झाले होते.
रेल्वे प्रशासन तात्काळ तिकीटासाठी अतिरिक्त शुल्क आकारत असले तरी त्यानुसार सुरक्षित व सन्मानजनक प्रवासाची सुविधा मिळत नसल्याची भावना प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकाराबाबत प्रवाशांनी रेल्वेच्या 139 हेल्पलाईनवर अधिकृत तक्रार नोंदवली असून, संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी करून अतिरिक्त गर्दी नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच तात्काळ तिकीटधारक प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि सन्मानजनक प्रवासाची हमी देण्याची आवश्यकता असल्याचे प्रवाशांनी स्पष्ट केले.
What's Your Reaction?
Like
10
Dislike
0
Love
4
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
4

