एम पूर्व आणि एम पश्चिम विभागात २४ तास पाणीपुरवठा विस्कळीत

तुर्भे निम्नस्तरीय ते उच्चस्तरीय जलाशयादरम्यान जलबोगदा कार्यान्वित करण्यासाठी २९ सप्टेंबर सकाळी १० ते ३० सप्टेंबर सकाळी १० या कालावधीत एम पूर्व व एम पश्चिम विभागातील काही भागांत पाणीपुरवठा विस्कळीत राहणार. त्यानंतर ७ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठ्याची शक्यता.

Sep 25, 2026 - 05:38
 0  3
एम पूर्व आणि एम पश्चिम विभागात २४ तास पाणीपुरवठा विस्कळीत
मुंबई पाणीपुरवठा, पाणीपुरवठा विस्कळीत, एम पूर्व विभाग, एम पश्चिम विभाग, तुर्भे जलबोगदा, तुर्भे निम्नस्तरीय जलाशय, तुर्भे उच्चस्तरीय जलाशय

प्रतिनिधी: देवानंद शिंदे 

तुर्भे निम्नस्तरीय ते उच्चस्तरीय जलाशयादरम्यान जलबोगदा कार्यान्वित करण्याचे काम; त्यानंतर ७ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा

मुंबई, दि. २४ सप्टेंबर २०२६ : मुंबईतील एम पूर्व आणि एम पश्चिम विभागातील पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या दृष्टीने तुर्भे निम्नस्तरीय जलाशय ते तुर्भे उच्चस्तरीय जलाशयादरम्यानचा जलबोगदा कार्यान्वित करण्याचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे.

या कामासाठी मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून बुधवार, ३० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत, म्हणजेच २४ तासांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

या कालावधीत एम पूर्व आणि एम पश्चिम विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे. तसेच काम पूर्ण झाल्यानंतर पुढील ७ दिवस काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे संबंधित परिसरातील नागरिकांनी आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा, पाण्याचा जपून वापर करावा आणि या कामासाठी महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

एम पूर्व विभागातील प्रभावित परिसर

२९ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते ३० सप्टेंबर रोजी सकाळी १० या कालावधीत पाणीपुरवठा विस्कळीत राहण्याची तसेच त्यानंतर सात दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असलेले एम पूर्व विभागातील परिसर पुढीलप्रमाणे आहेत :

लल्लूभाई संकुल, कमला रमणनगर, रमण मामा नगर

शिवाजीनगर, लोटस वसाहत, गौतमनगर, गायकवाड नगर

अयोध्या नगर, वाशीनाका, मानखुर्द

बेंगणवाडी, भारत नगर, म्हाडा इमारत

चिता कॅम्प, साठेनगर, झाकीर हुसेन नगर

देवनार गाव, देवनार वसाहत, नवीन भारत नगर

हशू आडवाणी नगर, नटवर पारेख संकुल

सह्याद्री नगर, वाढवली गाव, बी.ए.आर.सी. वसाहत

डम्पिंग सप्लाय

रफिक नगर, मंडाळागाव, नवीन मंडाळा

पद्मानगर, विष्णूनगर, एल. यू. गडकरी मार्ग

आर. एन. ए. पार्क, कुकरेजा इमारती वाशीनाका

महाराष्ट्र नगर, म्हाडा इमारती, इंडियन ऑइल नगर

बी. डी. पाटील मार्ग येथील रिफायनरी विभाग

एम पश्चिम विभागातील प्रभावित परिसर

एम पश्चिम विभागातील खालील परिसरांमध्येही या कालावधीत पाणीपुरवठा विस्कळीत राहण्याची शक्यता आहे :

मैत्री पार्क, घाटला, चेंबूर गावठाण

सुभाष नगर, सुमन नगर, चिखलवाडी, आंबेडकर नगर

वामनवाडी, आनंद नगर, लालडोंगर, सिद्धार्थ वसाहत

स्वस्तिक पार्क, पोस्टल वसाहत, डब्ल्यू. टी. पाटील मार्ग

मुक्ती नगर, काशीनाथ पाटील वाडी, संतोष नगर

केळकर वाडी, डायमंड उद्यान, सेंट्रल अव्हेन्यू मार्ग

एन. बी. पाटील मार्ग, जनार्दन पाटील मार्ग, घाटला गाव

एन. जी. आचार्य मार्ग, एस. टी. अँथोनी रोड

चंद्रोदय सोसायटी, स. गो. बर्वे मार्ग, चरई गाव

बोरला सोसायटी

एम. एस. इमारती १ ते ३२

चेंबूर कॅम्प, सिंधी कॅम्प, विजय विहार

भक्ती भवन, चिखलवाडी, समर्थ नगर, बसंत पार्क

सी. जी. गिडवाणी मार्ग, गांधी बाजार, जनता मार्केट

इंदिरा नगर, नवजीवन सोसायटी, गोल्फ क्लब

रामटेकडी, तोलाराम टॉवर, चेंबूर वसाहत

कोकण नगर, गणेश नगर, विजय नगर, अशोक नगर

अण्णाभाऊ साठे मार्ग, सिंधी सोसायटी, जिल्हाधिकारी वसाहत

मारवली चर्च, आर. सी. मार्ग

माहूल गाव, आंबापाडा गाव, म्हैसूर वसाहत

वाशी गाव, डी. बी. रियालिटी इमारत, वाडवली

शरद नगर, लक्ष्मी नगर, जनता नगर, वाशी नाका

जिजामाता नगर, जयहिंद नगर, आर. सी. मार्ग

फारूक गल्ली, पटेल नगर

बी.पी.सी.एल., माझगाव डॉक, टाटा पॉवर, एजिस लिमिटेड, बी.पी.टी.

भक्ती पार्क येथील सर्व इमारती व एम.एम.आर.डी.ए. इमारत

टिळक नगर, ठक्करबाप्पा वसाहत, पेस्तम सागर

सहकार नगर, वत्सलाताई नाईक नगर, श्रमजीवी नगर

शेल वसाहत

पी. एल. लोखंडे मार्ग, एकता मित्रमंडळ

मालेकर वाडी, पी. वाय. थोरात मार्ग, रमाबाई वसाहत

अमीर बाग, जनता नगर, मोतीलाल रहिवाशी संघ

कादरिया नगर, महात्मा फुले नगर, अजंठा वसाहत

सहदीप वसाहत, मुकुंद नगर, पंजाबी चाळ

नागेवाडी, छेडा नगर

नागरिकांनी पाणीसाठा करून ठेवण्याचे आवाहन

जलबोगदा कार्यान्वित करण्याचे काम पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आले आहे. मात्र, कामाच्या कालावधीत संबंधित परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठ्याच्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

त्यामुळे नागरिकांनी २९ सप्टेंबरपूर्वी आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा, पाणी जपून वापरावे आणि पुढील सात दिवस कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्याची शक्यता लक्षात घेऊन नियोजन करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.