रवींद्रनाथ टागोर चित्रकला महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा देखणा आविष्कार
परभणी येथील रवींद्रनाथ टागोर चित्रकला महाविद्यालयात वार्षिक कलाप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा उत्कृष्ट आविष्कार पाहायला मिळत आहे.
मराठवाडा ब्युरो- लक्ष्मण चौरे:
परभणी - रवींद्रनाथ टागोर चित्रकला महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा देखणा आविष्कार घडविणारे वार्षिक कलाप्रदर्शन उत्साहात सुरू असून नागरिकांकडून त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या प्रदर्शनात महाविद्यालयातील पायाभूत वर्ग तसेच एटीडी प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध विषयांवरील निवडक कलाकृती मांडण्यात आल्या आहेत. निसर्गचित्रे, रेखाचित्रे, तसेच संकल्पनात्मक कलाकृतींमधून विद्यार्थ्यांची कल्पकता आणि मेहनत स्पष्टपणे दिसून येत आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन केशव लागड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे अध्यक्ष डी. जी. सानप, प्रा. कुरेशी, भगवान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय सूर्यवंशी, प्रा. भिसे तसेच मराठवाडा ब्युरोचे पत्रकार लक्ष्मण चौरे उपस्थित होते.
प्रदर्शन १२ आणि १३ एप्रिल रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले आहे. कला रसिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0