मराठी अभिनेते राजेश शृंगारपुरे यांनी घेतले आई तुळजाभवानीचे दर्शन
मराठी अभिनेते राजेश शृंगारपुरे यांनी आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी पुजारी श्याम इंगळे यांनी विधिवत पूजा-अर्चा करून देवीचे आशीर्वाद दिले.
प्रतिनिधी : श्याम इंगळे
तुळजापूर : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते राजेश शृंगारपुरे यांनी आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन देवीचे आशीर्वाद घेतले. यावेळी मंदिरातील पुजारी श्याम इंगळे यांनी विधिवत पूजा-अर्चा करून धार्मिक परंपरेनुसार आई भवानी मातेची पूजा केली.
यावेळी राजेश शृंगारपुरे यांनी भक्तिभावाने आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले. पुजारी श्याम इंगळे यांनी त्यांना देवीच्या पूजेचे महत्त्व सांगून धार्मिक विधी पार पाडले.
आई तुळजाभवानीच्या दर्शनाने मनाला समाधान आणि आध्यात्मिक ऊर्जा मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.