सचिन अहिर, रवींद्र चव्हाण आणि महापौर रितू तावडे यांनी घेतले खासदार संजय दिना पाटील यांच्या गणरायांचे दर्शन
विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व महापौर रितू तावडे यांनी संजय दिना पाटील यांच्या गणरायांचे दर्शन घेतले.
मुंबई ब्यूरो : अनिल सावरे
मुंबई, दि. २३ (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या भांडुप पश्चिम येथील निवासस्थानी भेट देऊन गणरायांचे मनोभावे दर्शन घेतले.
विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी आज खासदार संजय दिना पाटील यांच्या निवासस्थानी भेट देत श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी खासदार राजोल संजय पाटील यांनी सचिन अहिर यांचे स्वागत केले. गणरायाच्या चरणी नतमस्तक होत सचिन अहिर यांनी बाप्पांचे आशीर्वाद घेतले.
याच भक्तिपूर्ण वातावरणात महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीदेखील खासदार संजय दिना पाटील यांच्या निवासस्थानी उपस्थित राहून श्री गणेशाचे दर्शन घेतले. त्यांनी गणरायाच्या चरणी श्रद्धा अर्पण करत आशीर्वाद घेतले.
दरम्यान, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी काल रात्री खासदार संजय दिना पाटील यांच्या भांडुप पश्चिम येथील निवासस्थानी भेट दिली होती. यावेळी खासदार संजय दिना पाटील आणि त्यांची ज्येष्ठ कन्या नगरसेविका राजोल संजय पाटील यांनी महापौर रितू तावडे यांचे आत्मीयतेने स्वागत केले. याप्रसंगी नगरसेविका जागृती पाटील यांचीही उपस्थिती होती.
गणरायांच्या दर्शनासाठी मान्यवरांची उपस्थिती
खासदार संजय दिना पाटील यांच्या निवासस्थानी गणरायांचे आगमन झाल्यापासून भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. गणरायांच्या दर्शनासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून उपस्थिती लावली जात आहे.
सचिन अहिर, रवींद्र चव्हाण आणि रितू तावडे यांच्या गणराय दर्शनामुळे पाटील यांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या भक्तिपूर्ण वातावरणाला विशेष रंगत आली. मान्यवरांनी बाप्पांच्या चरणी श्रद्धा अर्पण करून सुख, समृद्धी आणि मंगलमय आशीर्वादाची प्रार्थना केली.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने झालेल्या या भेटींमुळे खासदार संजय दिना पाटील यांच्या निवासस्थानी भक्ती, आनंद आणि उत्साहाचे वातावरण अधिकच खुलून आले. गणरायांच्या दर्शनाच्या निमित्ताने लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांची झालेली उपस्थिती हा गणेशोत्सवातील भक्तिपूर्ण क्षण ठरला.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0