येवल्यात गॅस टंचाईविरोधात वंचितचा एल्गार; तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

येवला येथे गॅस टंचाईविरोधात वंचित बहुजन आघाडीचा धडक मोर्चा; पुरवठा सुरळीत करण्याची मागणी.

Apr 7, 2026 - 14:49
 0  2
येवल्यात गॅस टंचाईविरोधात वंचितचा एल्गार; तहसील कार्यालयावर धडक मोर्चा
वंचित बहुजन आघाडीचा धडक मोर्चानाशिक

श्रीमती माधुरी अनिल वैद्य | नाशिक ब्यूरो 

वंचित बहुजन आघाडी च्या वतीने गॅस टंचाईच्या निषेधार्थ येवला येथे तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढत तीव्र आंदोलन करण्यात आले. “नरेंद्र, कब मिलेगा सिलेंडर” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडत कार्यकर्त्यांनी केंद्र व राज्य सरकारचा निषेध नोंदवला.

या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष प्रतिक अशोकराव शिंदे यांनी केले. यावेळी ॲड. भाऊसाहेब अहिरे, ॲड. सिद्धार्थ अहिरे, आशिष अहिरे, अमोल सोनवणे, प्रेम शिंगाडे, माऊली जोगदंड यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

गेल्या काही महिन्यांपासून येवला तालुक्यासह ग्रामीण भागात गॅस सिलेंडरची तीव्र टंचाई जाणवत आहे. नागरिकांना ४० ते ४५ दिवस प्रतीक्षा करूनही गॅस मिळत नसल्याने विशेषतः महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांनी तहसीलदारांना घेराव घालत प्रशासनाला जाब विचारला.

आंदोलनादरम्यान पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या:

येवला तालुक्यातील गॅस पुरवठा तातडीने सुरळीत करावा

गॅस सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्या एजन्सींवर कठोर कारवाई करावी

गॅससाठी नागरिकांची होणारी अडवणूक व मानसिक त्रास थांबवावा

यावेळी प्रतिक शिंदे यांनी इशारा दिला की, “सरकारने तातडीने उपाययोजना केल्या नाहीत तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.” आंदोलनानंतर मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सुपूर्द करण्यात आले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0