जिंतूर-कनेरगाव नाका येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा टायर जाळून भव्य रास्ता रोको आंदोलन

हिंगोली जिल्ह्यातील जिंतूर-कनेरगाव नाका येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सरसकट कर्जमाफी, डीएपी खताचा पुरवठा, विहीर व गाय गोठा अनुदानाची थकीत बिले तसेच घरकुल लाभार्थ्यांचे रखडलेले हप्ते जमा करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. सुमारे तीन तास चाललेल्या आंदोलनानंतर प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.

Jun 12, 2026 - 22:19
 0  7
जिंतूर-कनेरगाव नाका येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा टायर जाळून भव्य रास्ता रोको आंदोलन
जिंतूर कनेरगाव नाका आंदोलन, क्रांतिकारी शेतकरी संघटना, हिंगोली

हिंगोली | प्रतिनिधी : भगवानराव मस्के

शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने जिंतूर-कनेरगाव नाका महामार्गावर टायर जाळून भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली असून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आंदोलनकर्त्यांना यश आले.

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, डीएपी खताचा तात्काळ पुरवठा, विहीर व गाय गोठा अनुदानाची थकीत बिले अदा करणे तसेच घरकुल लाभार्थ्यांचे रखडलेले हप्ते तातडीने जमा करणे या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आले होते.

सुमारे तीन तास चाललेल्या या आंदोलनस्थळी सेनगावचे नायब तहसीलदार सरोदे साहेब, हिंगोलीचे गुण नियंत्रण अधिकारी काळे साहेब तसेच पंचायत समितीचे गट विस्तार अधिकारी देशमुख साहेब यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. संबंधित मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.

गोरेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार भिंगारे साहेब यांच्या मध्यस्थीने प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांमध्ये समन्वय साधण्यात आला. त्यानंतर रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले.

यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास मंत्रालय, मुंबई येथे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

या आंदोलनात गजानन कावरखे, नामदेव पतंगे, प्रवीण मते, श्याम मते, विठ्ठल वायचाळ, सखाराम भाकरे, अशोक जयस्वाल, दामोदर घुमणार, बबन कांबळे, विशाल पोळ, राहुल कावरखे, मनोहर सावके, संदीप मानमोठे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.