पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांना दिलासा; चंद्रागिरी प्रतिष्ठानकडून बियाण्यांचे मोफत वाटप

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात पेरणीच्या हंगामात चंद्रागिरी प्रतिष्ठान आणि पार्डीकर प्रोड्युसर कंपनीच्या संयुक्त विद्यमाने येळी, पारडी, सावळी व रामेश्वर परिसरातील शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Jun 26, 2026 - 18:25
 0  23
पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांना दिलासा; चंद्रागिरी प्रतिष्ठानकडून बियाण्यांचे मोफत वाटप
चंद्रागिरी प्रतिष्ठान, पार्डीकर प्रोड्युसर कंपनी, बियाणे वाटप

हिंगोली | प्रतिनिधी भगवानराव मस्के

पेरणीच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील येळी, पारडी, सावळी आणि रामेश्वर परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. चंद्रागिरी प्रतिष्ठान आणि पार्डीकर प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी बांधवांना बियाण्यांचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना वेळेवर दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देत शेती उत्पादनात वाढ करण्यास मदत करणे हा आहे. वाढता उत्पादन खर्च आणि विविध नैसर्गिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

बियाणे वाटप कार्यक्रमाला परिसरातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली. या सामाजिक उपक्रमाचे शेतकरी बांधवांनी स्वागत करत आयोजकांचे आभार मानले.

भविष्यातही शेतकऱ्यांच्या हितासाठी अशाच प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्यात येतील, अशी माहिती चंद्रागिरी प्रतिष्ठान आणि पार्डीकर प्रोड्युसर कंपनीच्या वतीने देण्यात आली.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1