राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांना मानद डॉक्टरेट; हिंगोलीत कार्यकर्त्यांकडून जल्लोष

राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांना 'भारत व्हर्च्युअल युनिव्हर्सिटी फॉर पीस अँड एज्युकेशन'तर्फे समाजकार्यातील योगदानाबद्दल 'डॉक्टर ऑफ फिलॉसफी (मानद)' पदवी प्रदान करण्यात आली. या सन्मानानंतर हिंगोलीत कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.

Jun 29, 2026 - 18:49
 0  101
राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांना मानद डॉक्टरेट; हिंगोलीत कार्यकर्त्यांकडून जल्लोष
रामराव वडकुते, मानद डॉक्टरेट, भारत व्हर्च्युअल युनिव्हर्सिटी फॉर पीस अँड एज्युकेशन, हिंगोली, राज्यसभा खासदार

हिंगोली प्रतिनिधी: भगवानराव मस्के

राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांना समाजकारण आणि राजकीय क्षेत्रातील दीर्घकालीन योगदानाची दखल घेत 'भारत व्हर्च्युअल युनिव्हर्सिटी फॉर पीस अँड एज्युकेशन' या संस्थेतर्फे 'डॉक्टर ऑफ फिलॉसफी (मानद)' ही मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.

२७ जून २०२६ रोजी झालेल्या कार्यक्रमात हा सन्मान प्रदान करण्यात आला. समाजकार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना हा बहुमान मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले.

या सन्मानानंतर हिंगोली शहरात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. तसेच खासदार रामराव वडकुते यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी संजयभाऊ कावडे, विनोद सोन्नर, करण गडदे, पंडित गडदे, गोरे तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 3
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 2