राजधानी दिल्लीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात; महाराष्ट्र सदनात अभिवादन

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शाहू महाराजांच्या सामाजिक परिवर्तनाच्या कार्याला आदरांजली वाहिली.

Jun 26, 2026 - 23:16
 0  1
राजधानी दिल्लीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात; महाराष्ट्र सदनात अभिवादन
राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शाहू महाराज जयंती,

प्रतिनिधी: नरेश शिंदे 

नवी दिल्ली, दि. २६ : सामाजिक परिवर्तनाचे प्रणेते आणि लोककल्याणकारी राज्यकर्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कॉपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदन येथे अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

कार्यक्रमास सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, सहायक लेखा अधिकारी निलेश केदारे, व्यवस्थापक प्रमोद कोलपत्ते यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

याप्रसंगी व्यवस्थापक प्रमोद कोलपत्ते यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. त्यांनी सामाजिक न्याय, शिक्षण, समता आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी शाहू महाराजांनी केलेल्या ऐतिहासिक कार्याचा आढावा घेत उपस्थितांना त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन केले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षण, सामाजिक न्याय, आरक्षण आणि सर्वसमावेशक विकासासाठी केलेले योगदान आजही समाजासाठी प्रेरणादायी असून, त्यांच्या जयंतीनिमित्त राजधानीत त्यांना अभिवादन करून त्यांच्या कार्याला मानवंदना देण्यात आली.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0