ज्येष्ठ समाजसेवक कमलेश पाटील यांना ‘दादासाहेब फाळके भारत गौरव सन्मान पुरस्कार - 2026’ प्रदान

विविध समाजघटकांमध्ये एकता, समन्वय आणि सामाजिक प्रबोधनासाठी गेल्या अडीच दशकांपासून कार्यरत असलेल्या ज्येष्ठ समाजसेवक कमलेश पाटील यांना नवी दिल्ली येथे आयोजित समारंभात "दादासाहेब फाळके भारत गौरव सन्मान पुरस्कार - 2026" प्रदान करून गौरविण्यात आले.

Jun 22, 2026 - 22:38
 0  152
ज्येष्ठ समाजसेवक कमलेश पाटील यांना ‘दादासाहेब फाळके भारत गौरव सन्मान पुरस्कार - 2026’ प्रदान
कमलेश पाटील, दादासाहेब फाळके भारत गौरव सन्मान 2026,

नवी दिल्ली प्रतिनिधी:

नवी दिल्ली, दि. 19 जून 2026 : विविध जात-समूहांमध्ये एकता, सामाजिक समन्वय आणि राष्ट्रीय विचारांचा प्रसार करण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक कमलेश पाटील यांना प्रतिष्ठेचा "दादासाहेब फाळके भारत गौरव सन्मान पुरस्कार - 2026" प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

0

राजेंद्र भवन, नवी दिल्ली येथे आयोजित विशेष समारंभात भारतीय मानव सेवा संगठन (दिल्ली), राजश्री चित्रपट निर्माता आणि प्रशिक्षण संस्थान (मुंबई) तसेच टीव्ही मालिका निर्माता, दिग्दर्शक व कलाकार संघटना (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

चित्रपट व दूरचित्रवाणी क्षेत्रातील निर्माती-दिग्दर्शिका आणि ख्यातनाम समाजसेविका डॉ. राजश्री वर्मा, भारतीय क्षत्रिय महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी सनदी अधिकारी व्ही. एस. निरंजन, ज्येष्ठ समाजसेवक उमेश पटेल आणि दिल्लीतील सामाजिक समन्वयासाठी कार्यरत असलेले ई. आर. एन. रॉय यांच्या हस्ते कमलेश पाटील यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.

गेल्या अडीच दशकांपासून कमलेश पाटील यांनी विविध समाजघटकांमध्ये सामाजिक ऐक्य निर्माण करण्यासाठी कार्य केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती ताराराणी आणि प्रथम शाहू महाराज यांच्या विचारांवर आधारित राष्ट्रीय समाजनिर्मितीचा संदेश देशभर पोहोचविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.

कमलेश पाटील हे राष्ट्रीय शिवाजी समाजाचे संयोजक, मराठा समन्वय परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष, मराठा सेवा संघाचे माजी राष्ट्रीय कार्याध्यक्ष तसेच पानिपत मराठा शौर्यदिन समारंभाचे संस्थापक पदाधिकारी म्हणून ओळखले जातात. शेतकरी, पशुपालक, कामगार, अभियांत्रिकी क्षेत्रातील विविध समाजघटकांना एका व्यापक सामाजिक समन्वयाच्या सूत्रात बांधण्याचे कार्य त्यांनी केले आहे.

जिजाऊ माँसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राष्ट्रीय समाजनिर्मिती व जातिनिर्मूलनाच्या विचारांचा प्रसार विविध समाजघटकांपर्यंत पोहोचवून सामाजिक एकात्मता बळकट करण्यासाठी त्यांनी योगदान दिले आहे. त्यांच्या "पे बँक टू सोसायटी" या सामाजिक उपक्रमाचीही विविध स्तरांवर दखल घेतली गेली आहे.

या सामाजिक कार्यामध्ये गुरुजी पुरुषोत्तम खेडेकर, कामाजी पवार, मराठा वीरेंद्रजी, मधुकर मेहेकरे तसेच उत्तर भारतातील मराठा इतिहासाचे संशोधक डॉ. एस. सी. गंगवार यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

समारंभाला महाराणा प्रताप यांचे वंशज विजयसिंह सिसोदिया, कारगिल युद्धातील शहीद कुटुंबीय, कलाकार अतुल जस्सी मदन, जी परवाना, उद्योजक कुलदीप कटियार, सुजान सिंह, सत्येंद्र मोहन, दीवानचंद गोयल, वरिष्ठ विधिज्ञ के. के. चौधरी, बी. आर. चौधरी, विद्यासागरजी, डॉ. संजीव पटेल, प्रमोद कुमार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मानव विकास, सामाजिक एकात्मता आणि समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यासाठी आयोजित या सोहळ्यात देशभरातील अनेक समाजसेवकांचा सन्मान करण्यात आला.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1