आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महाराष्ट्र सदनात विशेष योगसाधना कार्यक्रमाचे आयोजन

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त 21 जून रोजी महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे विशेष योगसाधना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. निवासी आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र सदन आणि दिल्ली मराठी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येणार असून सहभागासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे.

Jun 12, 2026 - 20:18
 0  11
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महाराष्ट्र सदनात विशेष योगसाधना कार्यक्रमाचे आयोजन
आंतरराष्ट्रीय योग दिन, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली,

नवी दिल्ली, दि. 12 : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे विशेष योगसाधना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. निवासी आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली आणि दिल्ली मराठी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने हा कार्यक्रम रविवारी, 21 जून रोजी सकाळी 6.30 ते 8.30 या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे.

कस्तुरबा गांधी मार्गावरील महाराष्ट्र सदन परिसरात होणाऱ्या या योगसाधना कार्यक्रमात सर्व वयोगटातील नागरिकांना सहभागी होता येणार आहे. योगाच्या माध्यमातून निरोगी, सक्रिय आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

कार्यक्रमात सहभाग पूर्णपणे विनामूल्य असून इच्छुकांनी पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. आयोजकांनी सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त श्वेता सिंघल यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. योग हा शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असून प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा अंगीकार करावा, असे त्यांनी नमूद केले.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित या विशेष उपक्रमात सहभागी होऊन नागरिकांनी आरोग्यदायी आणि सकारात्मक जीवनशैलीचा संकल्प करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.