नवी दिल्लीत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन; महाराष्ट्र सदनात आदरांजली
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात अभिवादन करण्यात आले. निवासी आयुक्त श्वेता सिंघल यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली.
नवी दिल्ली | प्रतिनिधी नरेश शिंदे
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि हरित क्रांतीचे जनक कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी (१ जुलै) नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात त्यांना अभिवादन करण्यात आले.
कोपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा सचिव श्वेता सिंघल यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, निवासी उपअभियंता जमुनाप्रसाद गंगवार, महाराष्ट्र सदनाचे व्यवस्थापक प्रमोद कोलपते, सहायक लेखाधिकारी निलेश केदारे तसेच इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून वसंतराव नाईक यांना अभिवादन केले.
कार्यक्रमादरम्यान व्यवस्थापक प्रमोद कोलपते यांनी वसंतराव नाईक यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या कृषी, सिंचन आणि सर्वांगीण विकासासाठी झालेल्या महत्त्वपूर्ण कार्याची माहिती दिली. हरित क्रांतीला चालना देत शेतकरीहिताचे निर्णय घेणारे दूरदृष्टीचे नेते म्हणून वसंतराव नाईक यांचे योगदान आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी उपस्थितांनी वसंतराव नाईक यांच्या विकासदृष्टीला आणि राज्याच्या प्रगतीसाठी दिलेल्या योगदानाला कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0