जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ आणि राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळात सामंजस्य करार; महाराष्ट्रासाठी १०० कोटींचा निधी

महाराष्ट्र शासनाच्या जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ आणि राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळ (NMDFC) यांच्यात नवी दिल्लीत सामंजस्य करार झाला. या करारामुळे महाराष्ट्रासाठी १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असून, जैन समाजातील अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांना कमी व्याजदरात शैक्षणिक कर्ज तसेच युवा उद्योजकांना उद्योग उभारणीसाठी आर्थिक सहाय्य मिळणार आहे.

Jun 29, 2026 - 23:07
 0  2
जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ आणि राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळात सामंजस्य करार; महाराष्ट्रासाठी १०० कोटींचा निधी
जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ, राष्ट्रीय अल्पसंख्यांक

प्रतिनिधी | नरेश शिंदे 

नवी दिल्ली, दि. २९ : महाराष्ट्रातील जैन समाजाच्या शैक्षणिक प्रगतीला आणि युवा उद्योजकतेला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ आणि राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळ (NMDFC) यांच्यात सोमवारी नवी दिल्लीत सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या कराराअंतर्गत महाराष्ट्रासाठी १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.

राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाच्या मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, व्यवस्थापकीय संचालक मेघना शिंदे तसेच राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाचे महाव्यवस्थापक अनिल कुमार यांनी महामंडळाच्या अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक आभा रानी सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

यावेळी जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे समन्वयक संदीप भंडारी, विकास आच्छा, विपिन जैन तसेच राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाचे जी.एम. (फायनान्स) कुमार सुदेश, जी.एम. (प्लॅनिंग) निक्सन माथुर, जी.एम. (अकाउंट्स) मनोज पुनिया आणि डी.जी.एम. पी. एस. पौणीकर उपस्थित होते.

या सामंजस्य करारामुळे जैन समाजातील अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी कमी व्याजदरात आणि सुलभ अटींवर शैक्षणिक कर्ज उपलब्ध होणार आहे. तसेच युवा उद्योजकांना उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य मिळणार असल्याने नवीन उद्योगांना चालना मिळून रोजगारनिर्मितीला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

याशिवाय या उपक्रमामुळे जैन समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा मिळणार असून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध होतील. नवउद्योजकांना आर्थिक पाठबळ मिळाल्याने स्वावलंबनाला प्रोत्साहन मिळणार आहे. महाराष्ट्रातील जैन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी हा करार महत्त्वाचा मैलाचा दगड ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0