जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र सदन येथे वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्त तथा सचिव डॉ. श्वेता सिंघल यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्र आणि महाराष्ट्र सदनातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Jun 5, 2026 - 18:56
 0  2
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र सदन येथे वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा संदेश
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र सदन येथे वृक्षारोपण;

पर्यावरण | राज्य | दिल्ली विशेष

प्रतिनिधी | नवी दिल्ली

महाराष्ट्र सदनात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा; डॉ. श्वेता सिंघल यांच्या हस्ते वृक्षारोपण

नवी दिल्ली, दि. ५ : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नवी दिल्ली येथील कस्तुरबा मार्गावरील महाराष्ट्र सदन येथे आज वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव डॉ. श्वेता सिंघल यांच्या हस्ते पर्यावरणपूरक वृक्षारोपण करण्यात आले.

पर्यावरण संवर्धन आणि हरित उपक्रमांना चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. वृक्षारोपणाद्वारे पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, सहायक लेखाधिकारी निलेश केदारे, व्यवस्थापक प्रमोद कोलापते, निवासी उपअभियंता जमुनाप्रसाद गंगवार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित या उपक्रमातून पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि शाश्वत विकासाचा संदेश देण्यात आला. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपणासह वृक्षसंवर्धनाची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने स्वीकारण्याची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0