नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य रामरावजी वडकुते यांचा हनुमान नगर येथे सपत्नीक भव्य नागरी सत्कार

नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य रामरावजी वडकुते यांचा हिंगोली जिल्ह्यातील हनुमान नगर येथे सपत्नीक भव्य नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास स्थानिक पदाधिकारी, मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Apr 24, 2026 - 19:53
 0  278
नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य रामरावजी वडकुते यांचा हनुमान नगर येथे सपत्नीक भव्य नागरी सत्कार
नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य रामरावजी वडकुते

हिंगोली प्रतिनिधी | भगवानराव मस्के

नवनिर्वाचित राज्यसभा सदस्य रामरावजी वडकुते यांचा हिंगोली जिल्ह्यातील हनुमान नगर येथे सपत्नीक भव्य नागरी सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात वडकुते दाम्पत्याचा सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी शिवसेना युवा जिल्हाध्यक्ष (हिंगोली) रामभाऊ कदम, हिंगोली नगरपरिषद नगरसेवक श्यामभाऊ कदम, शशिकांतभाऊ वडकुते, डॉ. मढणे (उदगीर), संजय मस्के (माजी सरपंच, शेनोडी), संजय कावडे, भास्कर बांगर, शंकर पुरी सर, गजानन मस्के, डॉ. प्रशांत घुगे यांच्यासह हनुमान नगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच रामभाऊ आणि श्यामभाऊ मित्र मंडळ, मारकड सर, प्रमोद मस्के, अर्जुन ढोने, ओंकार वडकुते आदी मान्यवरांनीही कार्यक्रमास हजेरी लावली.

या सत्कार सोहळ्यात उपस्थितांनी रामरावजी वडकुते यांच्या राज्यसभेवरील निवडीबद्दल अभिनंदन करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. परिसरात उत्साहाचे वातावरण असून नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 1