ठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई; सराईत घरफोड्या चोर जेरबंद, २१ घरफोडीचे गुन्हे उघडकीस

ठाणे गुन्हे शाखा घटक-३, कल्याणच्या पथकाने सराईत घरफोड्या चोराला उत्तर प्रदेशातून अटक करून २१ घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल केली आहे. आरोपीकडून सुमारे ३८.५० लाख रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि रायगड परिसरातील अनेक गुन्ह्यांची उकल झाली आहे.

Jun 25, 2026 - 19:22
 0  4
ठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई; सराईत घरफोड्या चोर जेरबंद, २१ घरफोडीचे गुन्हे उघडकीस
ठाणे गुन्हे शाखा, घरफोडी प्रकरण, राजेश राजभर, 21 घरफोडी गुन्हे,

ठाणे प्रतिनिधी:  नरेश शिंदे 

ठाणे : ठाणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत वाढत्या घरफोडीच्या घटनांचा तपास करताना गुन्हे शाखा घटक-३, कल्याणच्या पथकाने मोठी कामगिरी करत एका सराईत घरफोड्या चोराला जेरबंद केले आहे. या कारवाईत तब्बल २१ घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून लाखो रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे राजेश अरविंद राजभर (वय ३०) या आरोपीची ओळख पटली. मूळ उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने उत्तर प्रदेशातून ताब्यात घेऊन अटक केली.

पोलिसांनी आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने ठाणे शहर, नवी मुंबई, पालघर आणि रायगड परिसरात अनेक घरफोड्या केल्याची कबुली दिली. तपासादरम्यान आरोपीच्या नातेवाईकांकडून घरफोडीतील सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि इतर चोरीचा माल असा एकूण ३८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध यापूर्वीही ठाणे, ठाणे ग्रामीण आणि रायगड परिसरात सुमारे ३३ गुन्ह्यांची नोंद असून तो सराईत गुन्हेगार आहे. 

ही कारवाई ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक-३, कल्याणच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. 

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0