११ वर्षांपासून फरार असलेल्या NDPS प्रकरणातील आरोपीला वांद्रे पोलिसांकडून अटक

२०१४ मधील NDPS कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यातील ११ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपी हनीफ मुराद फाकी याला वांद्रे पोलिसांनी माहीम दर्गा परिसरातून गुप्त माहितीच्या आधारे ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपीविरुद्ध फेर अटकेसाठी जाहीरनामा जारी केला होता.

Jun 28, 2026 - 18:12
 0  9
११ वर्षांपासून फरार असलेल्या NDPS प्रकरणातील आरोपीला वांद्रे पोलिसांकडून अटक
वांद्रे पोलीस, NDPS प्रकरण, फरार आरोपी अटक, हनीफ मुराद फाकी,

मुंबई ब्यूरो | अनिल सावरे 

वांद्रे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २०१४ मध्ये दाखल झालेल्या NDPS कायद्यांतर्गत गुन्ह्यातील तब्बल ११ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला वांद्रे पोलिसांनी अखेर अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीविरुद्ध फेर अटकेसाठी जाहीरनामा जारी केला होता.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 24/2014 अंतर्गत NDPS Act कलम 8(क), 22 आणि 29 अन्वये गुन्हा दाखल असून या प्रकरणाचा सेशन केस क्रमांक 67/2015 मा. सत्र न्यायालय, मुंबई येथे सुरू आहे.

या प्रकरणातील आरोपी हनीफ मुराद फाकी (वय ४३ वर्षे) हा न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहत नसल्याने मा. सत्र न्यायालयाने त्याच्या फेर अटकेसाठी जाहीरनामा जारी केला होता.

जाहीरनाम्याच्या अनुषंगाने वांद्रे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू ठेवला होता. दरम्यान, गुप्त बातमीदारामार्फत आरोपी माहीम दर्गा परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून माहीम दर्गा परिसरात शोधमोहीम राबवली. आरोपी फुटपाथवर आढळून आल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.

त्यानंतर आरोपीला जाहीरनाम्याबाबत माहिती देऊन वांद्रे पोलीस ठाण्यात आणण्यात आले आणि संबंधित गुन्ह्यात त्याला विधिवत फेर अटक करण्यात आली.

अटक आरोपी

हनीफ मुराद फाकी, वय ४३ वर्षे

रा. जनता सेवक सोसायटी, गौसिया मस्जिदजवळ, माहीम (पश्चिम), मुंबई – १६.

अटक दिनांक

२७ जून २०२६

कारवाई करणारे अधिकारी

ही कारवाई वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (SrPI) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत पवार व त्यांच्या पथकाने केली.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0