मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्रीराम अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या चिंचभवन शाखेचे उद्घाटन

नागपूरातील चिंचभवन परिसरात श्रीराम अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या सहाव्या शाखेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके आणि इतर मान्यवर उपस्थित होते. बँकेच्या प्रगतीचा आढावा घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

May 30, 2026 - 22:34
 0  3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्रीराम अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या चिंचभवन शाखेचे उद्घाटन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्रीराम अर्बन को-ऑपरेटिव्ह

नागपूर, दि. ३० मे २०२६ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूरातील चिंचभवन परिसरात श्रीराम अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या चिंचभवन शाखेचे उद्घाटन करण्यात आले. काचोरे पाटील नगर येथे सुरू झालेली ही बँकेची सहावी शाखा असून या माध्यमातून परिसरातील नागरिकांना अधिक सुलभ बँकिंग सेवा उपलब्ध होणार आहेत.

या उद्घाटन सोहळ्याला महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके, माजी आमदार संदीप जोशी, महापौर नीता ठाकरे, नागपूर महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर, श्रीराम अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे अध्यक्ष पराग सराफ, उपाध्यक्ष अजित गोकर्ण यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बँकेचे अध्यक्ष पराग सराफ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बँकेच्या प्रगतीचा आढावा दिला. तसेच संचालक मंडळाची माहिती आणि बँकेच्या विविध उपक्रमांविषयी सविस्तर माहिती सादर केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन शाखेच्या उद्घाटनाबद्दल समाधान व्यक्त करत बँकेच्या संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. त्यांनी बँकेच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत ग्राहकाभिमुख सेवा आणि आर्थिक विकासात सहकारी बँकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे नमूद केले.

चिंचभवन परिसरातील वाढत्या नागरी विस्ताराच्या पार्श्वभूमीवर नव्या शाखेमुळे स्थानिक नागरिक, व्यापारी आणि उद्योजकांना बँकिंग व्यवहार अधिक सुलभ होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0