ओबीसी जातनिहाय जनगणनेसाठी जयपूर येथे जाहीर सभा; विविध प्रलंबित मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील जयपूर येथे ओबीC समाजाच्या जातनिहाय जनगणनेसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शासनाकडे आरक्षण, घुसखोरी रोखणे आणि बलुतेदार समाजाला न्याय देण्याच्या मागण्या करण्यात आल्या.
हिगोली प्रतिनिधी: भगवानराव मस्के
हिंगोली : ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी आणि समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, या प्रमुख मागण्यांसाठी सेनगाव तालुक्यातील जयपूर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला ओबीसी समाजातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सभेला ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे, बळीराम खटके, ॲड. रवी शिंदे तसेच कार्यक्रमाचे आयोजक आणि जयपूरचे सरपंच संदीप पांडुरंग पायघन यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून योग्य बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सभेदरम्यान उपस्थित मान्यवरांनी ओबीसी समाजाशी संबंधित विविध प्रश्न मांडत शासनाकडे ठोस मागण्या केल्या. यामध्ये ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना तातडीने करण्यात यावी, ओबीसी प्रवर्गात होणारी घुसखोरी रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, ओबीसी समाजातील १८ आलुते आणि १२ बलुतेदार घटकांना न्याय मिळावा तसेच ओबीसी आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अशा प्रमुख मागण्यांचा समावेश होता.
यावेळी वक्त्यांनी आपल्या भाषणातून ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी संघटितपणे लढा देण्याची गरज व्यक्त केली. समाजाच्या प्रश्नांबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन न्याय्य मागण्यांची पूर्तता करावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
सभेच्या शेवटी उपस्थितांनी ओबीसी समाजाच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण आणि विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
1