राहुल बोंद्रे यांचे महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य; जिल्ह्यात निषेधाची लाट

काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी महिलांच्या कुंकू व मंगळसूत्राबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात तीव्र निषेध व्यक्त होत आहे.

Apr 5, 2026 - 18:44
 0  24
राहुल बोंद्रे यांचे महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य; जिल्ह्यात निषेधाची लाट
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आणि राहुल बोंद्रे

बुलढाणा : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि चिखली विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिलेले Rahul Bondre हे काँग्रेस सोडून शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात रंगल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल बोंद्रे यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. दोघांमध्ये झालेल्या चर्चेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय चर्चांना अधिक उधाण आले.

मात्र, या सर्व चर्चांवर स्पष्टीकरण देताना राहुल बोंद्रे यांची जीभ घसरली. “ज्या महिलेला मी पतिव्रता आहे असे दाखवायचे असते, तीच महिला मोठे कुंकू लावते आणि मोठे मंगळसूत्र घालते,” असे वादग्रस्त विधान त्यांनी केले.

या वक्तव्यामुळे महिलांच्या भावना दुखावल्या असून जिल्हाभरातून तीव्र निषेध व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात कपाळावर मोठा कुंकू लावण्याची परंपरा ही सांस्कृतिक व धार्मिक श्रद्धेशी निगडित असल्याने, अशा विधानांमुळे समाजात नाराजी वाढली आहे.

“भाग्याच्या लेण्यावर लक्ष करणे कितपत योग्य?” असा सवाल उपस्थित करत अनेक महिला संघटनांनी बोंद्रे यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळातही चर्चा रंगल्या असून राहुल बोंद्रे यांना स्पष्टीकरण देण्याची मागणी होत आहे.

— महेंद्र मिश्रा, बु

लढाणा

What's Your Reaction?

Like Like 4
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0