गोदावरी अर्बन मल्टिस्टेटचा स्तुत्य उपक्रम; वर्धापन दिनानिमित्त रुग्णांना फळवाटप

गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीच्या महागाव शाखेच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

May 29, 2026 - 18:46
 0  6
गोदावरी अर्बन मल्टिस्टेटचा स्तुत्य उपक्रम; वर्धापन दिनानिमित्त रुग्णांना फळवाटप
गोदावरी अर्बन मल्टिस्टेट, महागाव, फळवाटप उपक्रम,

रवी वाघमारे: यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी 

महागाव : गोरगरीब आणि गरजू रुग्णांच्या सुख-दुःखाशी समरस होत सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था म्हणून गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीने पुन्हा एकदा आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. संस्थेच्या महागाव शाखेच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करून त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

२५ मे रोजी पार पडलेल्या या संवेदनशील उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. वर्धापन दिनानिमित्त अनावश्यक खर्च टाळून समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा निर्णय संस्थेने घेतला होता. त्यानुसार ग्रामीण रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.

हा सामाजिक उपक्रम संस्थेचे संस्थापक नामदार हेमंतभाऊ पाटील, अध्यक्षा राजश्रीताई पाटील तसेच बोर्ड ऑफ डायरेक्टर्स यांच्या मार्गदर्शनाखाली आणि व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. उपमहाव्यवस्थापक सुरेखा दवे, सहायक महाव्यवस्थापक रवी इंगळे आणि विजय शिर्मेवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

कार्यक्रमास वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निमिष धुळधुळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. राऊत, डॉ. नीलकंठ जाधव, कार्यक्रम सहाय्यक प्रभाकर मोरे तसेच आरोग्य सहाय्यक गोपाल ठाकरे यांचा समावेश होता. उपस्थित मान्यवरांनी गोदावरी अर्बनच्या या सामाजिक उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महागाव शाखेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. शाखा अधिकारी शशांक ढोबळे, सहाय्यक अधिकारी सचिन हिंगडे, जया घड्याळे, रामेश्वर शिंदे, सुयोग साकळे, ओमकुमार भोयर, प्रवीण अढागळे, अमोल रावते यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

“केवळ व्यवसाय करणे हा गोदावरी अर्बनचा उद्देश नसून समाजाप्रती असलेली सामाजिक जबाबदारी जपणे हे आमचे कर्तव्य आहे. भविष्यातही अशा प्रकारचे लोकउपयोगी आणि सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जातील,” असे गोदावरी अर्बन व्यवस्थापनाने सांगितले.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 1
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0
mimarathilive मी मराठी लाईव्ह हे महाराष्ट्रातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या देणारे मराठी न्यूज पोर्टल आहे. महाराष्ट्र, मुंबई, राजकारण, क्राईम, शिक्षण, मनोरंजन, क्रीडा, व्यवसाय आणि स्थानिक घडामोडींच्या ताज्या बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. अचूक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारिता हे आमचे उद्दिष्ट आहे.