विद्यार्थ्यांनी रेखाटला ‘स्वप्नातला भारत’; भारतीय जैन संघटनेच्या शाळेत चित्रकला उपक्रम
पिंपरीतील भारतीय जैन संघटनेच्या शाळेत ‘स्वप्नातला भारत’ या संकल्पनेवर चित्रकला उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विकसित भारताचे स्वप्न चित्रांमधून साकारले.
प्रतिनिधी: रोहन सोनाळे
पिंपरी, दि. २६ सप्टेंबर २०२६ (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभर राबविण्यात आलेल्या ‘स्वप्नातला भारत’ या संकल्पनेअंतर्गत भारतीय जैन संघटनेच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी विशेष चित्रकला उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारतीय जनता पार्टी संत तुकाराम नगरच्या वतीने आयोजित या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम घेण्यात आला.
या चित्रकला उपक्रमात शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपल्या कल्पनेतील भारत चित्रांच्या माध्यमातून साकारला. विकसित, सक्षम, स्वावलंबी, आधुनिक आणि प्रगत भारताचे स्वप्न विद्यार्थ्यांनी आपल्या चित्रांमधून मांडले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि कलागुणांना व्यासपीठ मिळावे, तसेच देशाच्या उज्ज्वल भविष्यासंदर्भात सकारात्मक विचारांची रुजवात व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश होता.
कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना लाडू-चिवडा व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.
यावेळी शाळेचे प्राचार्य देशमुख सर, उपप्राचार्य जाधव सर, यादव सर, भारतीय जनता पक्षाचे कोअर कमिटी सदस्य सदाशिवराव खाडे, माजी नगरसेवक तथा भाजप महिला मोर्चाच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सुजाताताई पालांडे यांच्यासह मंगेश धाडगे, महेंद्र बाविस्कर, अभय फाळके, राहुल खाडे, अमोल घोरपडे, दीपक पाटील, दिनेश पाटील, जयदेव अक्कलकोटे, तात्याराव गायकवाड, राहुल शितोळे आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी मोठे ध्येय ठेवावे
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कामगारनेते यशवंतभाऊ भोसले म्हणाले, “उद्याचा भारत म्हणजे तुम्ही विद्यार्थी आहात. भारताचे नाव जागतिक स्तरावर उंचावण्यासाठी तुम्हीही मोठे ध्येय ठेवले पाहिजे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून दिली आहे. त्याचप्रमाणे तुम्हीही भविष्यात मोठे होऊन देशाची मान जगात उंच करा.”
तसेच त्यांनी विशेषतः दहावीच्या विद्यार्थ्यांना आगामी परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच आपल्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला वाव देत भविष्यात देशाच्या विकासात योगदान द्यावे, असेही आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमावेळी सदाशिवराव खाडे, सुजाताताई पालांडे आणि प्राचार्य देशमुख सर यांनी यशवंतभाऊ भोसले यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या चित्रांचे कौतुक करत त्यांच्या कल्पकतेला प्रोत्साहन दिले.
‘स्वप्नातला भारत’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला व्यासपीठ मिळाले. आपल्या चित्रांमधून विद्यार्थ्यांनी भविष्यातील भारताबाबतच्या अपेक्षा, स्वप्ने आणि सकारात्मक दृष्टिकोन व्यक्त केला. नव्या पिढीमध्ये देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सकारात्मक विचार रुजविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0