पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विक्रमी कार्यकाळानिमित्त नाशिकच्या काळाराम मंदिरात महाआरती
देशाचे सर्वाधिक काळ सेवा देणारे निवडून आलेले पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी नवा विक्रम प्रस्थापित केल्याच्या निमित्ताने नाशिकच्या काळाराम मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजपचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि संत-महंत उपस्थित होते.
सुनेत्रा मांडवगडे | नाशिक प्रतिनिधी
देशाचे पंतप्रधान म्हणून सलग 4,399 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण करत नरेंद्र मोदी यांनी भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ सेवा देणारे निवडून आलेले पंतप्रधान म्हणून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. यापूर्वी हा विक्रम भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर होता. या ऐतिहासिक क्षणानिमित्त नाशिकच्या पंचवटी येथील काळाराम मंदिर येथे महाआरतीचे आयोजन करण्यात आले.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांच्या शुभहस्ते महाआरती संपन्न झाली. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाला राहुल ढिकले, माजी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, नगरसेविका जुई शिंदे, सुनील केदार, लक्ष्मण सावजी, चंद्रशेखर पंचाक्षरी तसेच आखाडा प्रमुख भक्तीचरणदास महाराज यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रभू श्रीरामाच्या चरणी प्रार्थना केली.
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती केली असून त्यांच्या विक्रमी कार्यकाळाबद्दल उपस्थितांनी अभिनंदन व्यक्त केले. महाआरतीनंतर उपस्थितांनी मोदी यांच्या दीर्घ आणि यशस्वी नेतृत्वासाठी शुभेच्छा दिल्या.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0