छत्रपती शिवाजीनगरमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय सुरुवात
नाशिकच्या छत्रपती शिवाजीनगरमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाची नगरसेवक दिनकर पाटील यांच्या हस्ते भक्तिमय सुरुवात.
- नाशिक ब्यूरो
नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९, छत्रपती शिवाजीनगर येथे सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सुरुवात करण्यात आली.
या सप्ताहाचे उद्घाटन नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक दिनकर पाटील यांच्या हस्ते विणा वाद्याचे पूजन करून करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेविका लता पाटील, नगरसेविका भारती धिवरे, नगरसेविका संगीता घोटेकर, माजी नगरसेवक रवींद्र धिवरे, नगरसेवक अमोल पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भक्तीमय वातावरणात सुरू झालेल्या या हरिनाम सप्ताहात कीर्तन, भजन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0