लोणार येथे हजारो योग अभ्यासकांचा विक्रम; त्रिकोणासन करत ‘एशिया बुक’मध्ये नोंद
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे 6 हजारांहून अधिक योग अभ्यासकांनी एकत्रित त्रिकोणासन करून विक्रम प्रस्थापित केला असून, त्याची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.
बुलढाणा | अमोल सराफ (विदर्भ ब्युरो)
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे आज हजारो योग अभ्यासकांच्या उपस्थितीत एक भव्य विक्रम प्रस्थापित करण्यात आला. तब्बल सहा हजारांहून अधिक योग साधकांनी एकत्रितपणे ‘त्रिकोणासन’ योगासन करून नवा इतिहास घडवला.
या उल्लेखनीय कामगिरीची नोंद ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये करण्यात आली असून, हा विक्रम बुलढाणा जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरला आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर 75 दिवस आधी आयोजित करण्यात आलेल्या या विशेष योग शिबिराचे आयोजन केंद्रीय आयुष मंत्री Prataprao Jadhav यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.
या कार्यक्रमात विविध संस्था, योग अभ्यासक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी स्वतःही या योग सत्रात सहभाग घेत त्रिकोणासन केले.
या भव्य उपक्रमामुळे योगाबद्दल जनजागृती होण्यास मदत झाली असून, लोणार आणि बुलढाणा जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उजळले
आहे.
What's Your Reaction?
Like
2
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0