खामगाव–जालना रेल्वे मार्गाला गती; भाऊसाहेब फुंडकर यांचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर

बुलढाणा जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरणारा खामगाव–जालना रेल्वे मार्ग प्रकल्प मंजुरीच्या मार्गावर असून राज्य सरकारने ५०% निधीची तरतूद केली आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळणार आहे.

Apr 18, 2026 - 18:11
 0  37
खामगाव–जालना रेल्वे मार्गाला गती; भाऊसाहेब फुंडकर यांचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर
खामगाव जालना रेल्वे, बुलढाणा बातम्या,

बुलढाणा - प्रतिनिध महेंद्र मिश्रा 

बुलढाणा : माजी कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांचे स्वप्न असलेला खामगाव–जालना रेल्वे मार्ग आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा हा रेल्वे प्रकल्प पुंजी निवेश कार्यक्रमांतर्गत मंजूर करण्यात आला आहे.

या रेल्वे मार्गासाठी लागणाऱ्या निधीपैकी ५० टक्के हिस्सा राज्य सरकारकडून उचलण्यात आला असून त्याची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे.

या प्रकल्पासाठी प्रतापराव जाधव, आकाश फुंडकर आणि संजय कुटे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका दर्शवली आहे.

खामगाव–जालना रेल्वे मार्गामुळे मध्य रेल्वे आणि सेंट्रल रेल्वे यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा निर्माण होणार असून, बुलढाणा जिल्ह्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

भाजप-शिवसेना सरकारचे सातत्यपूर्ण प्रयत्न

सन २००९ मध्ये प्रथमच लोकसभेत निवडून आल्यानंतर खासदार प्रतापराव जाधव यांनी या रेल्वे मार्गासाठी प्रयत्न सुरू केले होते. लोकसभेत वेळोवेळी प्रश्न उपस्थित करून त्यांनी या प्रकल्पाला गती दिली, ज्यामुळे रेल्वे सर्वेक्षणाला मंजुरी मिळाली.

त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने या रेल्वे मार्गाला तत्त्वतः मान्यता दिली. पुढे देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडून ५०% निधीची तरतूद करून प्रस्ताव केंद्राकडे पाठवला.

या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे माजी कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांचे स्वप्न साकार होण्याच्या दिशेने मोठी पायरी गाठली आहे.

दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन प्रकल्पासंदर्भातील प्रस्ताव पुढे नेला असून हा प्रस्ताव सध्या रेल्वे मंत्रालयाकडून अर्थ मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0