10 वी-12 वी विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूर विभागीय मंडळाची हेल्पलाईन सुरू; 8 जुलैपर्यंत सेवा उपलब्ध

16 जूनपासून सुरू होणाऱ्या इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांसाठी कोल्हापूर विभागीय मंडळाने विद्यार्थी आणि पालकांसाठी विशेष हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे. 8 जुलैपर्यंत सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत ही सेवा उपलब्ध राहणार असून परीक्षा संदर्भातील अडचणी व शंकांचे निरसन करण्यात येणार आहे.

Jun 16, 2026 - 01:46
 0  1
10 वी-12 वी विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूर विभागीय मंडळाची हेल्पलाईन सुरू; 8 जुलैपर्यंत सेवा उपलब्ध
कोल्हापूर बोर्ड हेल्पलाईन, 10 वी परीक्षा 2026, 12 वी परीक्षा 2026,

कोल्हापूर, dि. 15 (जिमाका) : जून-जुलै 2026 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षांना मंगळवार, 16 जूनपासून सुरुवात होत आहे. परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मार्गदर्शन मिळावे यासाठी कोल्हापूर विभागीय मंडळाने विशेष हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे.

कोल्हापूर विभागीय मंडळाच्या विभागीय सचिव अनुराधा म्हेत्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, परीक्षा कालावधीत उद्भवणाऱ्या अडचणी, शंका आणि मार्गदर्शनासाठी विद्यार्थी व पालकांना या हेल्पलाईनचा लाभ घेता येणार आहे. यासाठी मंडळातील अधिकारी, कर्मचारी आणि समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ही हेल्पलाईन सेवा 8 जुलै 2026 पर्यंत दररोज सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत कार्यरत राहणार आहे. परीक्षेसंदर्भातील कोणतीही अडचण निर्माण झाल्यास किंवा आवश्यक मार्गदर्शन हवे असल्यास विद्यार्थी व पालकांनी तात्काळ हेल्पलाईनशी संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.

परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांवरील ताण कमी करणे, योग्य माहिती उपलब्ध करून देणे आणि समस्यांचे त्वरित निराकरण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0