भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घेतले श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन

भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी संतनगरी शेगाव येथे पोहोचून श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

Apr 24, 2026 - 20:16
 0  4
भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घेतले श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन
रवींद्र चव्हाण, भाजपा प्रदेशाध्यक्ष, शेगाव बातमी

शेगाव -विदर्भ ब्यूरो 

भारतीय जनता पार्टीचे आमदार तथा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी संतनगरी शेगाव येथे पोहोचून श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांनी श्रींच्या चरणी प्रार्थना करून राज्याच्या प्रगतीसाठी आशीर्वाद घेतले.

भारतीय जनता पार्टीतर्फे शेगाव येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६ अंतर्गत जिल्हा प्रशिक्षण वर्ग योजना कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला संबोधित करण्यासाठी रवींद्र चव्हाण शेगाव येथे दाखल झाले होते.

यावेळी श्री संत गजानन महाराज संस्थानमध्ये आगमन झाल्यानंतर संस्थानचे विश्वस्त निळकंठदादा पाटील यांनी रवींद्र चव्हाण यांचे स्वागत करून सत्कार केला.

या प्रसंगी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय कुटे, भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रवींद्र चव्हाण यांच्या शेगाव भेटीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0