खामगावात ‘नारी शक्ती वंदन’ विधेयकाच्या समर्थनार्थ महिलांची भव्य रॅली; जल्लोषात उत्सव
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे ‘नारी शक्ती वंदन’ विधेयकाच्या समर्थनार्थ भाजपा महिला आघाडी व सामाजिक संघटनांनी भव्य रॅली काढून जल्लोष साजरा केला. महिलांच्या राजकीय सक्षमीकरणासाठी हा महत्त्वाचा टप्पा असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
बुलढाणा, दि. 16 (अमोल सराफ ब्युरो) :
खामगाव शहरात ‘नारी शक्ती वंदन’ अधिनियमाच्या ऐतिहासिक मंजुरीनिमित्त भाजपा महिला आघाडी तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने भव्य रॅली काढून जल्लोष साजरा करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर झालेल्या या विधेयकामुळे महिलांना राजकीय सक्षमीकरण मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. तसेच १६, १७ आणि १८ एप्रिल रोजी विशेष अधिवेशन आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला अभिवादन करून झाली. त्यानंतर अर्जुन जल मंदिर येथून रॅलीला प्रारंभ झाला. ही रॅली महावीर चौक, मेन रोड, मोहन चौक, शहीद भगत सिंह मार्ग चौक मार्गे टॉवर चौक भाजप ऑफिस येथे समाप्त झाली.
नगराध्यक्षा अपर्णाताई फुंडकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी विधेयकाच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीमही राबवण्यात आली.
या विधेयकामुळे महिलांच्या सक्षमीकरणाला चालना मिळणार असून, हा निर्णय ऐतिहासिक असल्याची भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केली.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0