दिव्यांग शाळांमध्ये शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस उत्साहात; विद्यार्थ्यांना साहित्य व मिष्टान्नाचे वाटप

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व दिव्यांग विशेष शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचे औक्षण करून शालेय गणवेश, शैक्षणिक साहित्य, पाठ्यपुस्तके आणि चॉकलेटचे वाटप करण्यात आले. यावेळी ‘नशामुक्त कोल्हापूर अभियान’ अंतर्गत सामूहिक शपथही घेण्यात आली.

Jun 16, 2026 - 01:42
 0  1
दिव्यांग शाळांमध्ये शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस उत्साहात; विद्यार्थ्यांना साहित्य व मिष्टान्नाचे वाटप
दिव्यांग शाळा, कोल्हापूर दिव्यांग विद्यार्थी, शाळेचा पहिला दिवस

कोल्हापूर, दि. 15 (जिमाका) : नवीन शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या प्रारंभी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व दिव्यांग विशेष शाळांमध्ये शाळेचा पहिला दिवस आनंद, उत्साह आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. नव्याने प्रवेश घेतलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी औक्षण करून स्वागत केले.

यावेळी विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, पाठ्यपुस्तके, शैक्षणिक साहित्य आणि चॉकलेटचे वाटप करण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. तसेच शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले.

जिल्ह्यातील सर्व दिव्यांग शाळांमधील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांनी ‘नशामुक्त कोल्हापूर अभियान’ अंतर्गत सामूहिक शपथ घेतली. समाजात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाच्या सक्षमीकरण अधिकारी साधना कांबळे यांनी शहरातील स्वयंम बौद्धिक अक्षम मुलांची शाळा, वि. म. लोहिया मूकबधिर विद्यालय आणि अंध मुलांची शाळा यांना भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. त्यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत नशामुक्तीची शपथ दिली.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0