मोहन नगर प्राथमिक शाळेत 'पहिले पाऊल' उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत

चिंचवड येथील मोहन नगरमधील लिलाबाई कांतीलाल खिवंसरा प्राथमिक शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी 'पहिले पाऊल' उपक्रमांतर्गत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे ढोल-ताशा व लेझीमच्या गजरात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, पोषण आहार आणि विविध वृक्षांच्या बियांचे वाटप करण्यात आले.

Jun 15, 2026 - 17:49
 0  3
मोहन नगर प्राथमिक शाळेत 'पहिले पाऊल' उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत
पहिले पाऊल उपक्रम, मोहन नगर शाळा, चिंचवड शाळा

पुणे प्रतिनिधी रोहन सोनाळे 

चिंचवड येथील मोहन नगर परिसरातील लिलाबाई कांतीलाल खिवंसरा प्राथमिक शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात झाली. शाळेत प्रथमच प्रवेश घेणाऱ्या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या 'पहिले पाऊल' स्वागत समारंभात चिमुकल्यांचे लेझीम आणि ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले.

सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांबरोबरच पालकांचाही मोठा सहभाग पाहायला मिळाला. शाळेच्या परिसरात आनंद, उत्साह आणि नव्या शैक्षणिक प्रवासाची उमेद दिसून आली.

कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी उपायुक्त संदीप खोत, नगरसेविका वैशालीताई काळभोर, नगरसेविका अरुणाताई लंगोटे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा पूजा समिंदर, मुलांच्या शाळेच्या मुख्याध्यापिका आशा विष्णू निचळ तसेच मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री कैचे यांची प्रमुख उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांसोबत वाढतील झाडे

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या वृक्षांच्या बियांचे वाटप करण्यात आले. "विद्यार्थी जसे शिक्षणातून मोठे व प्रगल्भ होतील, तसेच त्यांनी लावलेली झाडेही वाढतील," या पर्यावरणपूरक संकल्पनेतून शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मान्यवरांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी विद्यार्थ्यांना नियमित शाळेत उपस्थित राहण्याचे, मन लावून अभ्यास करण्याचे आणि विविध शैक्षणिक तसेच सांस्कृतिक उपक्रमांत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.

यावेळी नगरसेविका वैशालीताई काळभोर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, "तुम्ही सर्व मुले भारताचे उज्ज्वल भविष्य आहात. शाळेतील शिक्षण, संस्कार आणि पूर्वतयारी हीच देशाच्या प्रगतीची खरी ताकद आहे."

मोफत शैक्षणिक साहित्याचे वितरण

शासनाच्या विविध योजनांअंतर्गत विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके, शालेय गणवेश आणि शालेय पोषण आहाराचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह पाहायला मिळाला.

शिक्षकांचे विशेष योगदान

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यामध्ये सतीश पाटील, कृष्णा केंगले, कविता लांडगे, मनीषा टिळेकर, रोहिणी दिवेकर, चंद्रज्योती लोखंडे, छाया बाचकर, प्रतिभा गायकवाड आणि सुरेखा शिरसाठ यांचा विशेष सहभाग होता.

उत्साह, आनंद आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाची संस्मरणीय सुरुवात झाली.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0