बुलढाणा पोलिसांच्या ‘जिमी’चा देशात डंका; अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात प्रथम क्रमांक

नागपूर येथे झालेल्या 69 व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात बुलढाणा पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथकातील ‘जिमी’ या श्वानाने स्फोटक शोध श्रेणीत सुवर्णपदक पटकावून देशात प्रथम क्रमांक मिळवला.

Apr 5, 2026 - 22:17
Apr 5, 2026 - 22:44
 0  13
बुलढाणा पोलिसांच्या ‘जिमी’चा देशात डंका; अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात प्रथम क्रमांक
‘जिमी’

बुलढाणा फ्लॅश | अमोल सराफ विदर्भ ब्युरो

बुलढाणा : बुलढाणा पोलिसांच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकातील ‘जिमी’ या श्वानाने आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर देशपातळीवर बुलढाण्याचा झेंडा फडकवला आहे.

नागपूर येथे पार पडलेल्या 69 व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात ‘जिमी’ने स्फोटक शोध श्रेणीत सुवर्णपदक पटकावून देशात प्रथम क्रमांक मिळवला. देशभरातून आलेल्या शेकडो प्रशिक्षित श्वानांमध्ये जिमीने आपले वेगळेपण सिद्ध केले.

अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेत स्फोटक शोधण्याची क्षमता, वेग, अचूकता आणि प्रशिक्षण यांची कसोटी लागते. अशा स्पर्धेत जिमीने उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदक मिळवणे ही केवळ बुलढाणा जिल्ह्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

जिमीच्या या यशामुळे बुलढाणा पोलिस दलाचा सन्मान उंचावला असून, सर्व स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0