दिंडोरी अपघात प्रकरणी चौकशी समिती नियुक्त; ७ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश

दिंडोरीतील भीषण अपघात प्रकरणी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी चौकशी समिती नियुक्त करून ७ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

Apr 7, 2026 - 17:04
Apr 7, 2026 - 17:15
 0  2
दिंडोरी अपघात प्रकरणी चौकशी समिती नियुक्त; ७ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश
Nashik

- नाशिक ब्यूरो 

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे ३ एप्रिल २०२६ रोजी रात्री झालेल्या भीषण अपघाताची दखल घेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सखोल चौकशीसाठी समिती नियुक्त केली आहे.

या अपघातात इंदोरे (ता. दिंडोरी) येथील दरगोडे कुटुंबातील ६ शालेय विद्यार्थ्यांसह एकूण ९ जणांचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेची वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी आणि अपघातास कारणीभूत बाबींचा तपास करण्यासाठी स्वतंत्र चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये अभिजीत कदम (अध्यक्ष), यशवंत पाटील (सह-अध्यक्ष), रेखा विश्वकर्मा (सदस्य), रवींद्र चव्हाण (सदस्य) आणि विनोद जगताप (सदस्य सचिव) यांचा समावेश आहे.

समितीला अपघातस्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करणे, संबंधित अधिकारी व कामगारांचे निवेदन नोंदवणे, तसेच कामाच्या गुणवत्तेचा आणि सुरक्षा उपाययोजनांचा सखोल अभ्यास करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना सुचविण्याची जबाबदारीही समितीवर सोपविण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी समितीला ७ दिवसांच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच संबंधित नगरपंचायतीने चौकशीसाठी आवश्यक कागदपत्रे व सहकार्य उपलब्ध करून द्यावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

या घटनेमुळे रस्ते कामांदरम्यान सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून दोषींवर कडक कारवाईचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. ही चौकशी समिती शाम गोसावी यांच्या देखरेखीखाली कार्यरत राहणार आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0