रवींद्र एरंडे प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे; पोलीस कोठडीत ४ दिवसांची वाढ
नाशिकमध्ये रवींद्र एरंडे प्रकरणात जादूटोणा व ब्लॅकमेलिंग रॅकेटचा संशय; न्यायालयाने पोलीस कोठडी ४ दिवसांनी वाढवली.
- नाशिक ब्यूरो
नाशिक शहरातील एका धक्कादायक प्रकरणात पत्रकार रवींद्र एरंडे याच्याविरोधातील आरोप अधिक गंभीर होत चालले आहेत. लैंगिक शोषणाच्या आरोपांबरोबरच अघोरी प्रथा, जादूटोणा आणि वशीकरणाच्या माध्यमातून महिलांना जाळ्यात ओढल्याचा संशय तपासात व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांनी एरंडेच्या कार्यालयातून सापाची कात, पक्ष्यांचे अवयव, कवडी यांसारखे संशयास्पद साहित्य जप्त केले असून, हे साहित्य केवळ अंधश्रद्धेशी संबंधित नसून त्यामागे मोठ्या प्रमाणावर ब्लॅकमेलिंग रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता तपासातून पुढे येत आहे.
या प्रकरणाची तुलना कथित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाशी केली जात असून, अशाच पद्धतीने महिलांचे शोषण करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
अत्याचार आणि अॅट्रॉसिटीसह विविध गंभीर गुन्ह्यांखाली अटक करण्यात आलेल्या रवींद्र एरंडे याच्या पोलीस कोठडीत नाशिक न्यायालय यांनी चार दिवसांची वाढ केली आहे.
या प्रकरणाच्या पुढील तपासात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, या संपूर्ण रॅकेटचा उलगडा करण्यासाठी तपास यंत्रणा कसून चौकशी करत आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0