भाजपाचा स्थापना दिन उत्साहात साजरा; विक्रोळीत ध्वजारोहण
भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त विक्रोळी पार्क साईट येथे ध्वजारोहण करून ४६ वर्षांच्या समर्पणाचा उत्सव साजरा करण्यात आला.
भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या. "४६ वर्षे समर्पणाची, ४६ वर्षे भाजपाची" हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यात आला.
विक्रोळी पार्क साईट, वॉर्ड क्रमांक १२३ आणि १२४ येथे भाजपा कार्यालयासमोर ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी भाजपा नेते अनिल निर्मळे (ईशान्य मुंबई उपाध्यक्ष), उमेश कोठावदे आणि शंकर माडये यांच्या हस्ते पक्षाचा झेंडा फडकवण्यात आला.
या कार्यक्रमाला मंडळ अध्यक्ष संतोष गांजले तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
What's Your Reaction?
Like
5
Dislike
0
Love
1
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
2