मविप्रच्या केबीटी महाविद्यालयात राष्ट्रीय आंत्रप्रेन्योरशिप बूटकॅम्पचे उद्घाटन
नाशिकच्या केबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय स्तरावरील आंत्रप्रेन्योरशिप बूटकॅम्पचे उद्घाटन, २५० विद्यार्थी सहभागी.
मराठा विद्या प्रसारक संस्था संचलित केबीटी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे राष्ट्रीय स्तरावरील इनोव्हेशन, डिझाइन अँड आंत्रप्रेन्योरशिप (IDE) बूटकॅम्पचे उद्घाटन उत्साहात पार पडले.
या बूटकॅम्पच्या उद्घाटनप्रसंगी मविप्रचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांमधील इनोव्हेशन आणि आंत्रप्रेन्योरशिपला चालना देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (AICTE) यांच्या पुढाकारातून SBI Foundation आणि Wadhwani Foundation यांच्या सहकार्याने हा पाच दिवसीय बूटकॅम्प ६ ते १० एप्रिलदरम्यान आयोजित करण्यात आला आहे. देशभरातील विविध राज्यांमधून सुमारे २५० विद्यार्थी यात सहभागी झाले आहेत.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. यावेळी डॉ. देविदास गोल्हार, गोपाल शर्मा, डॉ. मिलिंद खांदवे, शशिकांत जाधव, श्रीकांत पाटील, डॉ. हेमंत वांजरे, प्रा. राजकिरण पुंड, डॉ. डी. डी. लोखंडे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. आर. देवणे यांची उपस्थिती होती.
प्राचार्य डॉ. देवणे यांनी सांगितले की, अशा बूटकॅम्पमुळे विद्यार्थ्यांच्या कल्पनांना दिशा मिळते आणि त्या प्रभावी उपायांमध्ये रूपांतरित होतात. गोपाल शर्मा यांनी आर्थिक पाठबळ आणि मार्गदर्शनाच्या अभावामुळे अनेक कल्पना साकार होत नाहीत, असे नमूद करत या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले.
डॉ. देविदास गोल्हार यांनी आंत्रप्रेन्योरशिपचे रोजगारनिर्मिती आणि राष्ट्रनिर्माणातील योगदान स्पष्ट केले. तर डॉ. मिलिंद खांदवे यांनी विद्यार्थ्यांना क्रिटिकल थिंकिंग, अॅडॅप्टॅबिलिटी आणि समस्या सोडवण्याच्या कौशल्यांचा विकास करण्याचे आवाहन केले. तसेच आधुनिक तंत्रज्ञान, विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यावर भर दिला.
या बूटकॅम्पमध्ये एक्स्पिरियन्शियल लर्निंग, लीडरशिप डेव्हलपमेंट आणि कल्पना ते अंमलबजावणी या प्रक्रियेमधील अंतर कमी करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0