आजरा सेवा संकल्प अभियानातून १३४ लाभार्थ्यांना दाखले व ई-रेशन कार्डचे वितरण

आजरा तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत १३४ लाभार्थ्यांना सातबारा, नॉन-क्रिमिलेअर, उत्पन्न, जातीचे दाखले आणि ई-रेशन कार्डचे वितरण करण्यात आले.

आजरा सेवा संकल्प अभियानातून १३४ लाभार्थ्यांना दाखले व ई-रेशन कार्डचे वितरण
आजरा सेवा संकल्प अभियान, आजरा तहसील कार्यालय, कोल्हापूर जिल्हा बातम्या, नॉन क्रिमिलेअर दाखला, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, सातबारा उतारा, ई-रेशन कार्ड,

प्रतिनिधी : उमेश जाधव 

नॉन-क्रिमिलेअर, उत्पन्न, जातीचे दाखले आणि ई-रेशन कार्डचे वाटप; विविध विभागांचा सहभाग

कोल्हापूर, दि. १७ ऑक्टोबर २०२६ : शासकीय सेवा नागरिकांपर्यंत सुलभतेने पोहोचविणे आणि प्रशासकीय कामकाज अधिक लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने महसूल व वन विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ आजरा तहसील कार्यालयात विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. १३ ऑक्टोबर रोजी झालेल्या या उपक्रमात नागरिकांना विविध शासकीय दाखल्यांचे वितरण करण्यात आले. तसेच विविध विभागांच्या योजनांची माहिती आणि आवश्यक मार्गदर्शन देण्यात आले.

या उपक्रमात महसूल, आरोग्य, सेतू, पंचायत समिती, महावितरण, पशुसंवर्धन आणि नगरपंचायत या विभागांनी सहभाग घेतला. तहसीलदार समीर माने यांनी उपस्थित नागरिकांना सेवा संकल्प अभियानाची माहिती दिली.

१३४ लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे वितरण

या उपक्रमांतर्गत महसूल विभागामार्फत नागरिकांना विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये ३५ लाभार्थ्यांना सातबारा उतारे, ४२ लाभार्थ्यांना नॉन-क्रिमिलेअर दाखले, २८ लाभार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले, ६ लाभार्थ्यांना जातीचे दाखले आणि २३ लाभार्थ्यांना ई-रेशन कार्ड देण्यात आले.

विविध शासकीय योजनांची माहिती आणि मार्गदर्शन

विविध विभागांच्या सहभागामुळे नागरिकांना शासकीय सेवा, उपलब्ध योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया आणि आवश्यक मार्गदर्शन एकाच ठिकाणी मिळाले. शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे, दाखले मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करणे आणि प्रशासन व नागरिक यांच्यातील समन्वय वाढविणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.