अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या कांदिवली युनिटची कारवाई; खोदियार नगर परिसरात संशयिताला ताब्यात घेतले

बोरीवली पूर्वेतील खोदियार नगर परिसरात मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाची कारवाई. ६९१ ग्रॅम हेरॉईन जप्त; अंदाजे १ कोटी ३८ लाख २० हजारांचा अमली पदार्थ, एकाला अटक.

अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या कांदिवली युनिटची कारवाई; खोदियार नगर परिसरात संशयिताला ताब्यात घेतले
Borivali Heroin Seized, Borivali Drug Case, Mumbai Anti Narcotics Cell, Heroin Seized Mumbai, Kandivali Unit, Mumbai Crime News, NDPS Act, 691 Gram Heroin, Khojiyar Nagar Borivali, Mumbai Police

मुंबई ब्यूरो; अनिल सावरे 

अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या कांदिवली युनिटची कारवाई; खोदियार नगर परिसरात संशयिताला ताब्यात घेतले

मुंबई : मुंबई उपनगरात अमली पदार्थांची तस्करी तसेच अवैध खरेदी-विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत बोरीवली पूर्वेतील खोदियार नगर परिसरात ६९१ ग्रॅम हेरॉईन जप्त करून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. जप्त हेरॉईनची अंदाजे किंमत १ कोटी ३८ लाख २० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दिनांक २९ सप्टेंबर २०२६ रोजी अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या कांदिवली युनिटचे पथक गस्तीवर असताना खोदियार नगर, बोरीवली (पूर्व), मुंबई येथे एका संशयित इसमाच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्या. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली.

सॅकबॅगमधून हेरॉईन जप्त

पोलिसांनी केलेल्या तपासणीत आरोपीच्या सॅकबॅगमधून एकूण ६९१ ग्रॅम वजनाचे हेरॉईन आढळून आले. या अमली पदार्थाची अंदाजे किंमत १,३८,२०,००० रुपये असल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

अवैध विक्रीसाठी हा अमली पदार्थ आणण्यात आल्याचा पोलिसांचा आरोप असून, या प्रकरणी आरोपीविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या कांदिवली युनिटमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल

या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी कक्ष युनिट गुन्हा क्रमांक ८८/२०२६ नोंदविण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध NDPS Act 1985 मधील कलम ८(क) सह २१(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, दिनांक २९ सप्टेंबर २०२६ रोजी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मुंबई व मुंबई उपनगर परिसरात अमली पदार्थांची तस्करी तसेच खरेदी-विक्री करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सहआयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा पूर्णिमा चौगले-शृंगी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

अंमली पदार्थ विरोधी कक्ष (गुन्हे शाखा) अंतर्गत कांदिवली युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल लोखंडे, पोलीस निरीक्षक निखिल शेळके आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मुंबई उपनगरात अमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून गस्त, तपासणी आणि संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची कारवाई सुरू असल्याचे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे.