चार श्रमसंहितांविरोधात सीटुतर्फे कामगार उपायुक्त कार्यालयावर होळी आंदोलन

केंद्र व राज्य सरकारच्या कामगार विरोधी चार श्रमसंहितांविरोधात सीटुच्या वतीने कामगार उपायुक्त कार्यालयावर धरणे आंदोलन करत नवीन कामगार कायद्यांची प्रतीकात्मक होळी करण्यात आली.

May 13, 2026 - 20:11
 0  39
चार श्रमसंहितांविरोधात सीटुतर्फे कामगार उपायुक्त कार्यालयावर होळी आंदोलन
चार श्रमसंहिता, सीटू आंदोलन, कामगार आंदोलन, कामगार उपायुक्त कार्यालय, श्रम कायदे, कामगार विरोधी धोरण, सीटू संघटना, पिंपरी चिंचवड आंदोलन, कामगार हक्क, धरणे आंदोलन, नवीन श्रम कायदे

नाशिक ब्यूरो 

पिंपरी-चिंचवड :

केंद्र व राज्य सरकारने लागू केलेल्या कामगार विरोधी चार श्रमसंहितांविरोधात सीटुच्या वतीने कामगार उपायुक्त कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी नवीन कामगार कायद्यांची प्रतीकात्मक होळी करून सरकारच्या धोरणांचा निषेध व्यक्त करण्यात आला.

कामगारांना गुलाम बनविण्याचे षडयंत्र रचले जात असून बहुराष्ट्रीय कंपन्या तसेच अदानी-अंबानी यांना मदत करण्यासाठी कामगार कायद्यांमध्ये बदल करण्यात येत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

या आंदोलनादरम्यान कामगार विरोधी चार श्रमसंहिता तात्काळ रद्द करण्यात याव्यात, या मागणीचे निवेदन कामगार उपायुक्त संदीप पाटील यांना देण्यात आले.

याचबरोबर मे धुमाळ इंडस्ट्रीजमधील कामगार आपल्या न्याय्य मागण्यांसाठी कामगार उपायुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करत असून या आंदोलनाला देखील सीटुतर्फे पाठिंबा जाहीर करण्यात आला.

या प्रसंगी उपस्थित कामगारांना मार्गदर्शन करताना सीटुचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉ. डॉ. डी. एल. कराड, जिल्हाध्यक्ष कॉ. सिताराम ठोंबरे, जिल्हा सरचिटणीस कॉ. देविदास आडोळे यांनी कामगारांच्या हक्कांसाठी एकजूट राहण्याचे आवाहन केले.

यावेळी कॉ. सतीश खैरनार, कॉ. संतोष काकडे, कॉ. अरविंद शहापुरे, कॉ. राहुल गायकवाड, कॉ. प्रकाश कोळी, कॉ. मोहन जाधव, कॉ. युवराज पाटील, कॉ. आत्माराम डावरे, कॉ. सचिन मालेगावकर, कॉ. संजय पवार, कॉ. पांडुरंग काटकर यांच्यासह मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0