धारावी पुनर्विकास प्रकल्पाला गती; पुनर्वसन इमारतींचे काम 42 महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन

धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पुनर्वसन इमारतींचे काम 42 महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असून माटुंगा परिसरातील पुनर्वसनासाठी 39 महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील काम मार्च 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

Jun 9, 2026 - 18:38
Jun 9, 2026 - 20:18
 0  10
धारावी पुनर्विकास प्रकल्पाला गती; पुनर्वसन इमारतींचे काम 42 महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन
धारावी पुनर्विकास प्रकल्पाला वेग; पुनर्वसन इमारतींचे काम 42 महिन्यांत पूर्ण होणार

मुंबई | प्रतिनिधी

धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पुनर्वसन इमारतींची उभारणी निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने वेगाने पावले उचलली असून धारावीतील पुनर्वसन इमारतींचे काम 42 महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच माटुंगा परिसरातील पुनर्वसनासाठी 39 महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

प्रकल्पाच्या आढावा बैठकीत ही माहिती देण्यात आली. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील काम मार्च 2028 पर्यंत पूर्ण करून संबंधित लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. पुनर्वसन प्रक्रियेला गती देत नागरिकांना आधुनिक आणि सुरक्षित निवास सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

बैठकीला मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी. गुप्ता, अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे, सचिव (नियोजन) शैला ए., बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्यासह विकासक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

धारावी पुनर्विकास प्रकल्प हा देशातील सर्वात मोठ्या शहरी पुनर्विकास योजनांपैकी एक मानला जात असून या प्रकल्पामुळे हजारो कुटुंबांना आधुनिक घरे, पायाभूत सुविधा आणि अधिक चांगल्या नागरी सुविधा उपलब्ध होणार आहेत. प्रशासनाने प्रकल्पाच्या अंमलबजावणीवर नियमित देखरेख ठेवून कामे वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांना आवश्यक निर्देश दिले आहेत.

What's Your Reaction?

Like Like 4
Dislike Dislike 0
Love Love 2
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 2