ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियानाला वेग; मुंबईत २,९१७ अनधिकृत पानटपऱ्यांवर कारवाई
ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियानांतर्गत जुलै २०२६ मध्ये मुंबई पोलिसांनी २,९१७ अनधिकृत पानटपऱ्यांवर निष्कासनाची कारवाई केली. शाळा-महाविद्यालय परिसरावर विशेष लक्ष.
मुंबई ब्यूरो: अनिल सावरे
जुलै २०२६ मध्ये २,९१७ अनधिकृत पानटपऱ्यांवर निष्कासनाची कारवाई; शाळा-महाविद्यालय परिसरावर विशेष लक्ष
मुंबई, दि. ११ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलेल्या ‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियानाला मुंबई पोलिसांकडून प्रभावी प्रतिसाद देण्यात येत असून, अंमली पदार्थांची निर्मिती, पुरवठा, तस्करी आणि विक्रीविरोधात कठोर कारवाई सुरू आहे. मुंबईला ड्रग्जमुक्त करण्यासोबतच तरुण पिढीला अंमली पदार्थांच्या विळख्यातून वाचविणे आणि नागरिकांच्या सामूहिक सहभागातून नशामुक्त मुंबई घडविणे, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.
जुलै २०२६ या कालावधीत मुंबई पोलिसांकडून शहरातील विविध प्रादेशिक विभागांमध्ये तब्बल २,९१७ अनधिकृत पानटपऱ्यांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये विशेषतः शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरातील अनधिकृत पानटपऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
मुंबई शहरातील पूर्व प्रादेशिक विभागात ७९३, पश्चिम प्रादेशिक विभागात ९६५, उत्तर प्रादेशिक विभागात ४८०, दक्षिण प्रादेशिक विभागात १९९ आणि मध्य प्रादेशिक विभागात ४८०, अशा एकूण २,९१७ अनधिकृत पानटपऱ्यांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
शाळा-महाविद्यालय परिसरात विशेष लक्ष
‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियानांतर्गत करण्यात येणाऱ्या कारवाईमध्ये अनधिकृत पानटपऱ्यांवरील निष्कासन कारवाईला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. विशेषतः शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात अशा प्रकारच्या कारवायांवर विशेष लक्ष दिले जात आहे.
तरुण पिढीला अंमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी केवळ कायदेशीर कारवाई न करता नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यावरही भर देण्यात येत आहे. यासाठी विविध ठिकाणी नियमितपणे जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.
अंमली पदार्थांची निर्मिती, पुरवठा, तस्करी आणि विक्रीविरोधात मुंबई पोलिसांकडून कठोर भूमिका घेण्यात आली असून, या कारवायांमुळे अंमली पदार्थांच्या गैरव्यवहाराला आळा घालण्यास मदत होणार आहे.
नशामुक्त मुंबईसाठी पोलिसांची विशेष मोहीम
‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियानाची प्रभावी आणि परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. अंमली पदार्थांची तस्करी व विक्री करणाऱ्यांविरोधात शून्य सहनशीलतेचे धोरण स्वीकारण्यात आले आहे.
मुंबईतील तरुण आणि युवकांना अंमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी पोलिसांकडून कारवाईसोबतच जनजागृतीवरही भर देण्यात येत आहे. शैक्षणिक संस्थांच्या परिसरात अंमली पदार्थांची उपलब्धता होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.
पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली अभियानाची अंमलबजावणी
‘ड्रग्ज फ्री मुंबई’ अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी बृहन्मुंबईचे पोलिस आयुक्त श्री. देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
मुंबईला नशामुक्त करण्यासाठी केवळ पोलिसांची कारवाई पुरेशी नसून नागरिकांचा सहभाग आणि जनजागृतीही तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे अंमली पदार्थांच्या गैरप्रकारांची माहिती पोलिस यंत्रणेला देण्यासोबतच पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिकांनीही नशामुक्त मुंबईच्या अभियानात सहभागी व्हावे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात येत आहे.
What's Your Reaction?
Like
1
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0