जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात सायबर सुरक्षेवर पोलिस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांचे मार्गदर्शन

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. सायबर गुन्हे, AI आधारित फसवणूक, डिजिटल व्यवहारांतील धोके आणि ऑनलाइन सुरक्षिततेबाबत या कार्यक्रमातून नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

May 23, 2026 - 00:16
 0  3
जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात सायबर सुरक्षेवर पोलिस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांचे मार्गदर्शन
जय महाराष्ट्र कार्यक्रम, संजय शिंत्रे, सायबर सुरक्षा

मुंबई, दि. २२ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित लोकप्रिय ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. या मुलाखतीत सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मुळे निर्माण होणारी नवी आव्हाने, ऑनलाइन फसवणूक आणि डिजिटल सुरक्षिततेसंदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती नागरिकांना दिली जाणार आहे.

ही विशेष मुलाखत दोन भागांमध्ये प्रसारित करण्यात येणार असून पहिला भाग मंगळवार, २६ मे २०२६ रोजी आणि दुसरा भाग मंगळवार, २ जून २०२६ रोजी रात्री ८ वाजता दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

तसेच ही मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत सोशल मीडिया माध्यमांवरही उपलब्ध होणार आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचेता गरुडे यांनी केले आहे.

मुलाखतीत डिजिटल युगातील सायबर गुन्ह्यांचे बदलते स्वरूप, तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणारे धोके यावर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.

विशेषतः खालील प्रकारच्या सायबर गुन्ह्यांविषयी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे :

डिजिटल अरेस्ट फसवणूक

फिशिंग हल्ले

बनावट फोन कॉल्स

सोशल मीडिया फसवणूक

व्हॉईस क्लोनिंग

डीपफेक व्हिडिओ

AI आधारित आर्थिक फसवणूक

महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अल्पवयीन मुलांना लक्ष्य करणाऱ्या सायबर गुन्ह्यांबाबत विशेष माहितीही या मुलाखतीत देण्यात आली आहे.

तसेच ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी, वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याचे उपाय, सायबर गुन्ह्यांची तक्रार कशी आणि कुठे करावी तसेच राज्य आणि केंद्र शासनाच्या सायबर सुरक्षेसंदर्भातील विविध उपाययोजनांची माहितीही कार्यक्रमातून देण्यात येणार आहे.

डिजिटल व्यवहार वाढत असताना नागरिकांनी अधिक सजग राहून ऑनलाइन सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात येणार आहे.

What's Your Reaction?

Like Like 1
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0