महाडीबीटी पोर्टलवर २५ मेपर्यंत अर्ज करा; शेतकऱ्यांसाठी बियाणे अनुदान व प्रात्यक्षिक योजना सुरू

कृषी विभागामार्फत कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी तूर, नाचणी, वरी, सोयाबीन व भुईमूग पिकांच्या प्रात्यक्षिकांसह बियाणे अनुदान योजना राबविण्यात येत आहे. इच्छुकांनी २५ मे २०२६ पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत.

May 19, 2026 - 00:25
 0  4
महाडीबीटी पोर्टलवर २५ मेपर्यंत अर्ज करा; शेतकऱ्यांसाठी बियाणे अनुदान व प्रात्यक्षिक योजना सुरू
महाडीबीटी, शेतकरी योजना, बियाणे अनुदान, कृषी विभाग,

mahadbt.maharashtra.gov.in⁠� वर २५ मे २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया, राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान तसेच कडधान्य आत्मनिर्भरता अभियान २०२६-२७ अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र शेतकरी गटांसाठी तूर, नाचणी, वरी, सोयाबीन आणि भुईमूग पिकांची प्रात्यक्षिके राबविण्यात येणार आहेत.

यासोबतच पात्र शेतकऱ्यांना प्रमाणित बियाणे संच (मिनीकिट) आणि बियाणे अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या योजनेंतर्गत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था पात्र राहणार आहेत.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खरीप हंगामासाठी विविध तालुक्यांमध्ये मंजूर पिकांनुसार योजना राबविण्यात येणार आहे.

तालुकानिहाय मंजूर पिके

तूर – करवीर, कागल, राधानगरी, शिरोळ, पन्हाळा, शाहूवाडी, गडहिंग्लज

नाचणी – करवीर, कागल, राधानगरी, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, गडहिंग्लज, भुदरगड, आजरा, चंदगड

वरी – राधानगरी, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, भुदरगड, आजरा, चंदगड

सोयाबीन व भुईमूग – करवीर, कागल, राधानगरी, गगनबावडा, शिरोळ, हातकणंगले, पन्हाळा, शाहूवाडी, गडहिंग्लज, भुदरगड, आजरा, चंदगड

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे Farmer ID असणे बंधनकारक आहे. तसेच शेतकरी गटाची नोंदणी ३१ मार्च २०२६ पूर्वी झालेली असावी. अर्ज केवळ महाडीबीटी पोर्टलवरूनच स्वीकारले जाणार असून तालुकानिहाय व पिकनिहाय मंजूर लक्षांकानुसार योजना राबविण्यात येणार आहे.

कृषी उपसंचालक नामदेव परीट यांनी जास्तीत जास्त शेतकरी गट आणि पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. तांत्रिक माहितीसाठी संबंधित गावातील कृषी सेवक, सहाय्यक कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

Like Like 2
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0