एम.डी. ड्रग्ज विक्रीप्रकरणी तीन आरोपी अटक; ४३५.९० ग्रॅम मेफेड्रोनसह ड्रग्ज निर्मितीचे साहित्य जप्त
पायधुनी पोलिसांची मोठी कारवाई; एम.डी. ड्रग्ज विक्रीप्रकरणी तीन आरोपींना अटक. आरोपींकडून ४३५.९० ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले असून ड्रग्ज निर्मितीसाठी वापरले जाणारे साहित्यही हस्तगत करण्यात आले.
मुंबई ब्यूरो: अनिल सावरे
मुंबई : एम.डी. अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या आरोपींविरोधात पायधुनी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून अंदाजे ४३५.९० ग्रॅम वजनाचा मेफेड्रोन (एम.डी.) अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या एम.डी.ची अंदाजे किंमत १३ लाख ०९ हजार ३०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच एम.डी. ड्रग्ज निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्यही पोलिसांनी जप्त केले आहे.
पायधुनी पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथक गस्त घालत असताना जंजीकर स्ट्रीट, २रा माळा, हॉटेल जोडिया, मस्जिद बंदर पश्चिम, मुंबई परिसरात छापेमारी करण्यात आली. या कारवाईत मेफेड्रोन ड्रग्ज बाळगणाऱ्या दोन इसमांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली होती.
गुन्ह्याच्या पुढील तपासादरम्यान पोलिसांनी आणखी एका आरोपीचा शोध घेत त्याला धोबी गल्ली, पायधुनी येथून अटक केली.
अटक करण्यात आलेले आरोपी
कपिल गुलशन अरोरा, वय ३२ वर्षे
मोहम्मद आसिफ इक्बाल शेख, वय ४४ वर्षे
सय्यद अस्लम शेख, वय ३३ वर्षे
पोलिसांच्या माहितीनुसार, वरील तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत.
तपासादरम्यान आरोपींकडून एकूण ४३५.९० ग्रॅम मेफेड्रोन (एम.डी.) जप्त करण्यात आले. याची अंदाजे किंमत १३,०९,३०० रुपये असल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच तपास पुढे नेताना आरोपी उल्हासनगर, जिल्हा ठाणे येथील एका घरातून मेफेड्रोन ड्रग्ज तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले.
या प्रकरणाचा पुढील तपास पायधुनी पोलीस करीत असून, जप्त करण्यात आलेल्या साहित्याचा तसेच आरोपींच्या अमली पदार्थांच्या व्यवहारातील संभाव्य संबंधांचा तपास सुरू आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सहआयुक्त मनोजकुमार शर्मा (कायदा व सुव्यवस्था), अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे (दक्षिण प्रादेशिक विभाग), पोलीस उपायुक्त रणज्युधा आर. (दक्षिण परिमंडळ-०२) तसेच सहायक पोलीस आयुक्त पायधुनी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पायधुनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे, पोलीस निरीक्षक अजय कदम, सहायक पोलीस निरीक्षक किरण मांडे तसेच पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.
अमली पदार्थांच्या विक्री व निर्मितीविरोधात मुंबई पोलिसांची कारवाई सुरू असून, या प्रकरणाच्या तपासातून ड्रग्ज पुरवठ्याच्या साखळीतील आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0